प्रफुल्ल पवार झी मीडिया, अलिबाग : पोलीस (Police) म्हटलं की आपल्यासमोर अजूनही भ्रष्टचारी अशीच प्रतिमाच उभी राहते, मात्र सर्वच तसे नसतात. काही पोलीस हे आपल्या कर्तव्यापलिकडे जाऊन माणूसकी जपतात, याचीच प्रचिती शुक्रवारी मध्यरात्री अपघातग्रस्तांना आली. या पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे 3 अपघातग्रस्तांना मोठी मदत झाली. यामुळे त्यांना वेळीच उपचार मिळू शकले. ही घटना रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील (KarleKhind) कार्लेखिंडतील आहे. (accident on i 20 van at karlekhind alibag pen road due to loss of control 3 injured)
शुक्रवारी मध्यरात्री अलिबाग-पेण मार्गावरील (Alibaug-Pen Road) कार्लेखिंडीत I 20 या गाडीला अपघात झाला. पेणच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीत तिघे जण होते. मात्र चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी थेट दरीत जाऊन कोसळली. ऐन महामार्गावर हा सर्व अपघात घडल्याने बघ्यांची एकच गर्दी जमली. पण मदतीसाठी एकही व्यक्ती पुढे आला नाही.
सुदैवाने त्याचवेळी पोलीस त्याच मार्गावरुन जिल्हागस्त करुन परतत होते. मात्र तिथे जमलेली गर्दी पाहून पोलीस थांबले. पोलीस निरीक्षक जगताप, पोलीस नाईक मितेष म्हात्रे आणि पोलीस शिपाई नितीन पाटील (निवृत्त मेजर) गर्दीच्या ठिकाणी गेले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अपघाताची माहिती मिळाली.
अपघातग्रस्त दरीत कोसळल्याने मदतीची याचना करत होते. मात्र गाडी दरीत कोसळलेली आणि एकच अंधार होता. त्यामुळे कोणाचीही दरीत उतरुन मदत करण्याची हिंमत होत नव्हती.
पोलिसांसमोर खोल दरी, गर्द अंधार, पावसामुळे झालेला निसरडा रस्ता अशी अनेक आव्हानं होती. मात्र कारण देतील ते पोलीस कसले. तर दुसऱ्या बाजूला मितेष म्हात्रे यांनी बचावकार्यासाठी आवश्यक वस्तूंसह रुग्णवाहिका बोलावली.
रुग्णवाहिकेसह रस्सी, बॕटरी आणि बचावकार्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू मिळाल्या. पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता बचावकार्य सुरु केलं. नितीन पाटील सैन्य दलातून निवृत्त झालेले आहेत. सैन्यसेवेत असताना त्यांना बचावकार्याचा चांगलाच अनुभव. या अनुभवाचा फायदा या बचावकार्यादरम्यान झाला. नितिन पाटील तात्काळ दरीत उतरले. आर्मी स्टाईलने जखमींना वर आणण्यासाठी प्रयत्न केलं.
जवळपास 1 तास हे बचावकार्य चाललं. त्यानंतर यशस्वीरित्या या तिघांना वर आणण्यात यश आलं. यानंतर या जखमींना अलिबागमधील सिव्हिल हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी नेण्यात आलं. दरम्यान पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या धाडसाचं जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
अलिबाग-पेण मार्गावरील कार्लेखिंडीत I 10 गाडीला अपघात, पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अपघातग्रस्तांना मदत. #Alibaug #Karlekhind #MarathiNews #म #मराठी pic.twitter.com/WBnUJqXNJD
— Sanjay Patil (@patil23697) August 6, 2022