भिडेंसह काँग्रेसच्या ‘शिदोरी’ वर सुद्धा कारवाई होणार! फडणवीसांची विधानसभेत स्पष्टोक्ती

Action On Shidori: माध्यमात प्रसारीत झालेल्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांचे व्हीडीओ व्हाईट सॅम्पल घेतले घेतले जातील, असे फडणवीस म्हणाले. जितेंद्र आव्हाडांनी यासंदर्भात तक्रार केली होती. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 2, 2023, 01:03 PM IST
भिडेंसह काँग्रेसच्या ‘शिदोरी’ वर सुद्धा कारवाई होणार! फडणवीसांची विधानसभेत स्पष्टोक्ती title=

Action On Shidori: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावरुन विधानसभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. संभाजी भिडेंच्या विधानाचा विषय आज विधानसभेत मांडण्यात आला. यावेळी भिडे यांच्याविषयी शुक्रवारी विषय आणलेला स्थगन प्रस्ताव नाकारला. आता तो विषय आणता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते. 

संभाजी भिडे प्रकरणावरुन विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी निवेदन सादर केले. यामध्ये अमरावती पोलिसांकडून भिडेंना नोटीस पाठवली असल्याचे ते म्हणाले. संभाजी भिडे यांच्यावर अमरावतीत येथे गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच सावरकरांच्या अपमानाप्रकरणी कॉंग्रेसचे मुखपत्र 'शिदोरी' वर कारवाई होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

माध्यमात प्रसारीत झालेल्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांचे व्हीडीओ व्हाईट सॅम्पल घेतले घेतले जातील, असे फडणवीस म्हणाले. जितेंद्र आव्हाडांनी यासंदर्भात तक्रार केली होती. 

संभाजी भिडे यांना सीआरपीसी 41 अ ची नोटीस पाठवली आहे. अमरावती पोलिसांनी पाठवलेली नोटीस संभाजी भिडे यांनी स्वीकारली आहे. त्यानुसार चौकशी होईल. भाषणाचे व्हिडीओ उपलब्ध नाहीत असे पोलिसांनी सांगितले. माध्यमांमध्ये फिरत आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणावरील आहेत. 

यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनीही तक्रार दाखल केली आहे. ती अमरावती पोलिसांकडे वर्ग केली आहे. कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही अवमानजनक वक्तव्य केले तर त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल, असे फडणवीस म्हणाले.

संभाजी भिडे हिंदुत्वासाठी काम करतात. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांच्या किल्ल्यांसोबत ते बहुजन समाजाला जोडतात. हे कार्य चांगले आहे. त्यांना महापुरुषांवर वक्तव्य करण्याचा अधिकार दिलेला नाही. महापुरुषांवर कोणी वक्तव्य केले तर कारवाई होईल," असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले

सभागृहात कोणी असे वक्तव्य केले तर त्याच्यावर कारवाई होईल. वीर सावरकरांवर वादग्रस्त लिखाण करणाऱ्यांवर कारवाई होईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.