Manoj Jarange Maratha Reservation : मराठा आंदोलनात मोठी फूट पडली असतानाच मनोज जरांगे पाटील यांना मठा धक्का बसला आहे. आता मराठा समाजानेच मनोज जरांगे यांच्या विरोधात आंदोलन छेडले आहे. मनोज जरांगे यांचा पुतळा देखील जाळण्यात आला आहे. यामुळे आता मराठा आंदोलनात मोठा ट्विस्ट आला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे सातत्याने सरकारवर दबाव आणण्याचा प्रय्तन करत आहेत. मनोज जरांगे यांनी साखळी उपोषणाची घोषणा केली आहे.
मनोज जरांगे यांच्या विरोधात नागपुरात आंदोलन करण्यात आले आहे. मराठा समाजाने मनोज जरांगे यांचा निषेध करत आंदोलन छेडले आहे. महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावर अभद्र अणि खालच्या पातळीवर टीपणी केल्याचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाने आंदोलन केले. नागपुरातील मराठा समाज महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी हे निषेध आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगेने फडणवीस यांच्यावर खोटे गैर कायदेशीर आरोप करत असल्याचा नागपुरातील मराठा समाजाचा आरोप आहे...यामुळे मराठा समाजाच्या अस्मितेला ठेच पोहचली याच्या निषेधार्थ हे निषेध आंदोलन असल्याचे मराठा बांधवांनी सांगितले.
मराठा आंदोलक मनोज जरांगें पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले.. सागर बंगल्यावर येतो, आपल्याला गोळ्या घालून मारून टाका, असं आव्हानच त्यांनी गृहमंत्री फडणवीसांना दिलं. तर जरांगे यांची स्क्रिप्ट पवार, ठाकरेंसारखीच आहे, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं. कुणी कायदा सुव्यवस्थेचं पालन करत नसेल तर योग्य कारवाई करावीच लागेल, असा इशारा फडणवीसांनी दिलाय.
मुंबई मोर्चावेळी शेवटच्या दोन गुप्त बैठकांमध्ये काय झालं हे मनोज जरांगेंनी स्पष्ट करावं असं सांगत जरांगेंचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जरांगेंची भूमिका पारदर्शक नाही जरांगे हेकेखोर असून ते दररोज पलटी मारतात असा आरोप बारसकरांनी केलाय. तर बारसकरच्या माध्यमातून आंदोलन संपवण्याचा हा डाव असल्याचा पलटवार जरांगेंनी केला होता.
मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडे यांनी देखील जरांगेंवर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे हा शरद पवारांचा माणूस असल्याचा खळबळजनक आरोप वानखेडेंनी केला. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालं मग आता आंदोलनाची गरज काय? असा सवाल वानखेडेंनी जरांगेना विचारलाय.