अमरावती: वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून एक आठवड्याचा कडकडीत बंद असणार आहे. अनलॉकनंतर महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येत आहे.
कोरोनाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमरावतीमध्ये 60 टक्के भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 12 प्रतिबंधित क्षेत्र देखील जाहीर करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पुढील 7 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तर अमरावती जिल्ह्यामध्ये आजही विकेंण्ड लॉकडाऊन सुरू आहे. उद्या संध्याकाळपासून हा लॉकडाऊन सुरू होणार आहे. उद्या दिवसभर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
अमरावती महापालिका क्षेत्रातील तबल 60 टक्के भागात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. खबरदारीसाठी अमरावती शहरात तब्बल 12 प्रतिबंधक क्षेत्र जाहीर करण्यात आली आहेत. अमरावतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 36 तासांचा वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन आज रात्री उशिरा संपणार आहे. उद्या संध्याकाळी 7 पर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची मुदत देण्यात आली आहे. पुन्हा सोमवारी संध्याकाळी 7 पासून 7 दिवस लॉकडाऊन करण्यात येत आहे.
अमरावती जिल्ह्यात वाहतूक व्यवस्था सुद्धा बंद करण्यात आली असून, जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था बंद असल्यानं याचा फटका आता बाहेरून आलेल्या प्रवाशांना बसताना दिसत आहे. बस स्थानकासमोर प्रवासी सकाळपासून ताटकळत उभं राहावं लागत आहे.