Crime News : चहा पिणयासाठी गेला आणि मोठ्या अडचणीत सापडला; एका क्षणात होत्याचं नव्हत झालं

चहा पित असताना एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे (Crime News). 

Updated: Mar 2, 2023, 11:45 PM IST
Crime News : चहा पिणयासाठी गेला आणि मोठ्या अडचणीत सापडला; एका क्षणात होत्याचं नव्हत झालं title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : चहा पिण्याची तलफ असल्यामुळे  एका व्यक्ती मोठ्या अडचणीत सापडला आहे.  हॉटेलवर चहा घेण्यासाठी गेलेल्या मुद्रांक विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. जालनामध्ये (Jalna) भर दिवसा ही थरारक घटना घडली आहे (Crime News). या घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

जालन्यातील रजिस्ट्री कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. मृत व्यक्ती मुद्रांक विक्रेता आहे. ते हॉटेलवर चहा पित असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. मुद्रांक विक्रेत्याच्या मानेवर धारदार चाकूने वार करून हल्लेखोर फरार झाले. 

संभाजी उर्फ सुहास डेंगळे (वय 50 वर्षे) असं या हल्ल्यात जखमी झालेल्या मुद्रांक विक्रेत्याचं नाव आहे. जूना जालना भागातील मुक्तेश्‍वर वेशीजवळ असलेल्या एका चहाच्या हॉटेलसमोर ही घटना घडली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मुद्रांक विक्रेता संभाजी डेंगळे यांचे जालना शहरातील रजिस्ट्री कार्यालयाजवळच त्यांचे कार्यालय आहे. सायंकाळच्या सुमारास कार्यालया जवळ असलेल्या मुक्तेश्‍वर वेशीजवळील एका चहाच्या हॉटेलवर ते मित्रांसह चहा पीत बसले होते. त्यांच्या बाजुला एक अनोळखी व्यक्ती बराच वेळ त्यांच्यासोबत बसली होती. काही वेळातच त्याने शेजारीच बसलेल्या संभाजी ढेंगळे यांच्या मानेवर चाकु हल्ला करत घटनास्थळावरून पळ काढला. 

हल्लेखोर घटनास्थळावरुन पळत असतांना उपस्थितांनी त्याला खुर्च्या फेकून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला त्या लागल्या नाहीत. त्यामुळे तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. संभाजी ढेंगळे यांच्या मानेला मोठी जखम झाली असून, एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. पोलिसांचे एक विशेष पथक हल्लेखोरांच्या मागावर पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या घटनेप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.