काश्मीरचे सफरचंद थेट पुण्यात उपलब्ध

काश्मीरचे प्रसिध्द असणारे सफरचंद आता पुण्यात मिळत आहेत. 

Updated: Sep 24, 2019, 07:05 PM IST
काश्मीरचे सफरचंद थेट पुण्यात उपलब्ध title=

पुणे : काश्मीरचे प्रसिध्द असणारे सफरचंद आता पुण्यात मिळत आहेत. काश्मीरचा आणि तेथील शेतकऱ्यांचा आर्थिक विकासासाठी सफरचंदाची मोठी बाजारपेठ मिळवण्यासाठी काश्मीर ते पुणे थेट सफरचंद असा उपक्रम राबविण्यात आला आहे. काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. मात्र आजतागायत हा स्वर्ग अनुच्छेद ३७० आणि ३५ अ च्या साखळ्यांनी बांधला होता.. मात्र आता हे पाश तुटले आहेत. 

देशभरातील व्यवसायिक आणि उद्योगांना काश्मीरचे दरवाजे खुले झाले आहेत. त्यामुळेच काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार आणि संस्था सरसावल्यात. पुण्यामध्ये सरहद्द संस्थेच्यावतीने कश्मिरी सफरचंदांची विक्री सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ७५ ते १०० रुपये किलो एवढ्या कमी दरामध्ये अस्सल काश्मिरी चविष्ठ सफरचंद ग्राहकांना उपलब्ध झाली आहेत. दोन दिवसांमध्ये जवळजवळ २० टन सफरचंदांची विक्री झाली आहे.

विकासाचे दरवाजे उघडले जात असताना काश्मिरी शेतकरीही स्वतःहून व्यवसायासाठी पुढे येत आहेत. दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना धमकावले होते. सफरचंद विक्री करायचे नाही म्हणून. मात्र, सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने काश्मीरची सफरचंद पुण्यात आणली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहेत.
 
अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काही जणांनी कश्मिरी सफरचंद बाजारात येणार नाहीत, अशी वल्गना केली होती. मात्र या फुटिरतावाद्यांच्या अपप्रचाराला काश्मिरी जनतेने बिलकुल भीक घातलेली नाही, हेच स्पष्ट होत आहे.