'ड्रोन कॅमेऱ्यानं तातडीनं व्हावेत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे'

गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास उशीर होत असून पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य निघून जातंय.

Updated: Feb 15, 2018, 07:26 PM IST
'ड्रोन कॅमेऱ्यानं तातडीनं व्हावेत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे'  title=

जालना : गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास उशीर होत असून पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य निघून जातंय.

त्यामुळे पिकांच्या नुकसानीचे ड्रोन कॅमेऱ्याने किंवा सॅटेलाईटने तातडीने पंचनामे करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय. जालना दौऱ्यावर असताना अशोक चव्हाण यांनी पत्रकारांसमोर ही प्रतिक्रीया व्यक्त केली.

शेतकऱ्यांसाठी हेक्टरी सरकारने जाहीर केलेली रक्कम अल्प असून हेक्टरी किमान ५० हजार रुपये तरी मिळालीच पाहिजे, अशीही मागणी चव्हाण यांनी केली. 

अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जालना जिल्ह्यातील वंजारउम्रद येथील गारपिटीने मृत्युमुखी पडलेल्या नामदेव शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं.

यावेळी शिंदे यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपये मदत करण्याची चव्हाण यांनी घोषणा करत गावकऱ्यांशी संवाद साधला.