औरंगाबाद : औरंगाबादमध्ये भाजप नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय फत्तेलष्कर यांच्यावर तलवारीनं हल्ला करण्यात आला आहे. बेगमपुरा भागामध्ये ही घटना घडली आहे. विद्यापीठ परिसरात व्यायाम करून संजय फत्तेलष्कर परतत होते. तेव्हा ४ जणांनी तलवारीनं त्यांच्यावर हल्ला केला. संजय यांना गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी संजय यांच्यावर मिरची पूड फेकली आणि तलवारीनं हल्ला केला. विद्यापीठातील हॉस्टेल क्रमांक २ जवळ हा हल्ला करण्यात आला आहे.