बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फटकळ स्वभाव आणि त्यातून त्यांनी ओढलेले फटकारे कायमच चर्चेचा विषय ठरतात. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या बारामतीतून गैरव्यवहार आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांना दिलेली तंबी मात्र चांगलीच चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सज्जड दमच भरलाय असं म्हणायला हवं.
बेकायदेशीर आणि अवैध व्यवसाय, तसंच सावकारी करणा-यांना मोका लावला जाईल किंवा तडीपार केलं जाईल असा दम भरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दिला. नको ती कामं घेऊन येऊ नका. उपमुख्यंत्री वसुली करायला बसलेला नाही अशी तंबीच त्यांनी दिली.