बीड : 'गोपीनाथ मुंडे' गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली खदखद व्यक्त केली. आमदारकी गेल्यापासून ते ओबीसी नेत्यांना डावलण्यापर्यंत सर्वाला कारणीभूत सांगताना भाजपाच्या राज्यातील नेतृत्वाकडे त्यांचा रोख होता. पण हे प्रकरण खासदार संजय काकडे यांनी स्वत:च्या खांद्यावर घेत पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आणि पंकजा समर्थकांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली. संजय काकडे यांचा भाजपच्या विविध स्तरावरून निषेध केला जात आहे. संजय काकडेचं करायच काय खाली मुंडके वर पाय..संजय काकडे मुर्दाबादच्या घोषणा देत बीड भाजपा कडून संजय काकडेंचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
यावेळी भाजपा पदाधिकारी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दोन दगडावर हात ठेवणारे संजय काकडे संधी साधू असून त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हा अध्यक्ष रमेश पोकळे यांनी व्यक्त केली.
संजय काकडेंनी त्यांच्या अवकातीत रहावं अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपाच्या महिलां पदाधिकारी संगीता धसे यांनी दिली. पंकजा मुंडे संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपा खासदार संजय काकडे यांचा बीड मध्ये भाजपा कडून घोषणादेत तीव्र निषेध केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
स्व. मुंडे साहेबांनी संजय काकडेला मोठं केलं याचं भान राहिले नाही. ओळख साहेबांनी दिली तें संजय काकडे ग्रामपंचायत निवडणूक लढवली आसती तरीत्यांना ओळखलं असतं.संजय काकडे कोणत्या पक्षाचे आहेत हे आम्हांला माहिती.रात्री एक आणि सकाळी एक अशी बोलायची सवय आहे.
काकडे हे खासदारकीची उमेदवारी मागण्यासाठी दारोदारी फिरतात. अजित पवारांना भेटतात. ते सगळय़ा दगडांवर हात ठेवणारे संधी साधू असल्याची टीका करण्यात आली आहे. संजय काकडेंनी आत्मपरीक्षण करावे. मुंडे साहेबांनी मोठं केलं त्यांना विसरले..संजय काकडेंनी त्यांच्या अवकातीत रहावं अशा संतप्त प्रतिक्रिया भाजपाच्या महिलां पदाधिकारी संगीता धसे यांनी दिली..
काकडे भाजपत फूट पाडत असल्याचा गंभीर आरोप माधुरी मिसाळ यांनी केलाय. भाजप नेतृत्वानं पंकजा मुंडेंची नाराजीही बेदखल केलीय पण आता हे पक्षात फूट पाडण्याचे आरोप झाल्यावर भाजप नेतृत्व याची दखल घेणार की नाही ? हा प्रश्न आहे. मी नाराज नाही म्हणणाऱ्या पंकजा मुंडे किती नाराज आहेत ? हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. पंकजांची खदखद बाहेर पडताच भाजप नेतृत्वाची पाठराखण करण्याचे प्रयत्न सुरू झालेले दिसत आहेत.
पंकजा मुंडेंचं कालचं भाषण म्हणजे स्वतःच्या पराभवाचं खापर देवेंद्र फडणवीसांवर फोडण्याचा प्रकार असल्याचे काकडे म्हणाले. पंकजा मुंडे पक्षाला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पंकजा यांनी सत्तेत असताना कुठल्या समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत म्हणून त्यांचा पराभव झाला. आता स्वतः अपयश झाकण्यासाठी त्या उपद्व्यापी वक्तव्य करत असल्याची टीका भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी केली होती.
सोशल मीडियावर नाराजीचा सूर व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडे भाजप सोडणार का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. परंतु, 'मी पक्ष सोडणार नाही... पक्षाला मला सोडायचंय तर पक्षानं निर्णय घ्यावा' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं. 'मी पक्ष सोडावा अशी कुणाची इच्छा आहे का? कुणी या वावड्या उठवल्या?' असं म्हणत त्यांनी स्वकीयांवर निशाणा साधलाय.मला कुठल्याच पदाची अपेक्षा नाही, असं म्हणत कोअर कमिटीच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावं, अशी विनंती त्यांनी चंद्रकांत पाटलांकडे केली.