चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, ठाणे : एका महिलेला राज्याचा मुख्यमंत्री(woman Chief Minister) करण्यासंबंधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी एक विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यनंतर राज्यात पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण असतील याची चर्चा सुरु झाली. रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांची नावे चर्चते आहेत. महिला मुख्यमंत्री झाल्यावर महिलांचे प्रश्न सुटतील? यावर भाजप नेत्या चित्रा वाघ(BJP leader Chitra Wagh) यांनी दिलेली प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे.
महिला संपर्क अभियानाच्या अंतर्गत आज भाजपाच्या नेता चित्रा वाघ यांनी अंबरनाथ आणि उल्हासनगर मतदारसंघात बैठक घेतली यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात जास्तीत जास्त महिला मंत्री दिसतील असं चित्रा वाघ म्हणाल्या.
आम्ही विरोधात असताना आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांवरील अत्याचार कमी होतील हे कधी म्हटलं नव्हतं. राज्यात महिला मुख्यमंत्री झाल्यावर महिलांचे प्रश्न लगेच सुटतील अशी मानणारी मी नाही असं चित्रा वाघ म्हणाल्या. 15 , 16 वर्षाच्या मुलींचे जबरदस्तीने धर्मांतरण केलं जात आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर किंबहुना त्यापेक्षा कडक लव्ह जिहाद कायदा राज्यात आला पाहिजे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.