पिंपरी-चिंचवड : खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेला नगरसेवक पोलिसांना सापडत नाही. मात्र पालिकेत तो अर्ज करतो. हा सारा आश्चर्यकारक प्रकार, पिंपरी चिंचवड महापालिकेत घडला आहे. हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेले पिंपरी चिंचवड महापालिकेतले भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे जवळपास दोन महिने फरार आहेत.
नियमानुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभांना २ महिने गैरहजर राहिल्यावर नगरसेवकपद आपसूक रद्द होतं. हे टाळण्यासाठी तुषार हिंगे यांनी महापालिकेच्या विधी समितीत सर्वसाधारण सभांना अनुपस्थित राहणार असल्याचा अर्ज केला आहे.
एवढंच नाही तर त्यावर दोन नगरसेवकांच्या सह्याही आहेत. विशेष म्हणजे विधी समितीत हा विषय ऐन वेळी दाखल झाला आणि तो मंजूरही केला गेला. फरार हिंगे यांनी अर्ज केलाच कसा, भाजपचे कोणते नेते त्यांना भेटले, कुणी अर्ज आणून दिला असे सवाल करत विरोधकांनी या प्रकारणी चौकशीची मागणी केली आहे. यावर भाजपचा सारसारवीचा प्रयत्न आहे.