PM Modi In Chandrapur : भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा चंद्रपुरात घेतली. या प्रचार सभेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार घेतला. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.
मोदींनी चंद्रपुरात आज काँग्रेसला कारल्याची उपमा दिली. त्यासाठी त्यांनी मराठीतली म्हणही सर्वांना बोलून दाखवली. मोदींनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे सरकार राज्याचे हिताचे काम करत आहेत.
राम मंदिर निर्माण कार्याला काँग्रेसनेच विरोध केला. काँग्रेस पक्षामुळे डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना भारतरत्न मिळण्यास विलंब झाला? काँग्रेसने फक्त कमिशन खाण्याचे काम केले असे अनेक गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 2024 लोकसभेची निवडणूक ही स्थिरते विरुद्ध अस्थिरतेविरोधात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.