पुण्यापाठोपाठ राज्यातील मोठ्या शिक्षण संस्था EDच्या रडावर; बड्या अधिकाऱ्यांचे पुरावे हाती

पुणे जिल्ह्यात खासगी अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) कसून चौकशी सुरू आहे. कोट्यवधींच्या या घोटाळ्यात ईडीच्या रडारवर काही अधिकारी, संस्थाचालकही असण्याची शक्‍यता आहे.  

सागर आव्हाड | Updated: Aug 5, 2022, 11:27 AM IST
पुण्यापाठोपाठ राज्यातील मोठ्या शिक्षण संस्था EDच्या रडावर; बड्या अधिकाऱ्यांचे पुरावे हाती title=

पुणे : पुणे जिल्ह्यात खासगी अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) कसून चौकशी सुरू आहे. कोट्यवधींच्या या घोटाळ्यात ईडीच्या रडारवर काही अधिकारी, संस्थाचालकही असण्याची शक्‍यता आहे.  जसजसे पुरावे हाती लागतील, त्यानुसार ईडीकडून काही जणांचा फास आवळला जाण्याची शक्‍यता आहे.

पुणे जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक भरती झाली असून, यात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ED) कसून तपासणी करीत आहे.

तत्कालीन शिक्षणाधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांचा समावेश असलेल्या एकूण 28 जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. ईडीकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. 

ED ने फिर्यादी पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसान भुजबळ यांना नुकतेच मुंबईला चौकशीसाठी बोलावले होते. यात पाच-सहा तास किसन भुजबळ यांची चौकशी करण्यात आली.

प्रकरण कसे घडले, कोणा कोणाचा यात हात आहे, आर्थिक घोटाळा कसा झाला, याबाबत भुजबळ यांच्याकडे चौकशी करण्यात आल्याचे समजते. भुजबळ यांनी प्रकरणाची सर्व माहिती, पुरावे, आवश्‍यक ती कागदपत्रे ईडीला सादर केली आहेत.

पुढच्या आठवड्यात भुजबळ यांना पुन्हा ईडीच्या चौकशीसाठी सामोरे जावे लागणार आहे. यावेळी आणखी काही पुरावे सादर करण्यात येणार आहेत.