चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर फुटओवर ब्रिजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, 13 जण जखमी

रेल्वे फुटओवर ब्रिजचा (footover bridge) स्लॅब (Slab collapsed) अचानक कोसळला. हा स्लॅब कोसळल्याने 13 प्रवासी जखमी झाले आहेत.

Updated: Nov 28, 2022, 07:59 AM IST
चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर फुटओवर ब्रिजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, 13 जण जखमी title=

Chandrapur Slab of footover bridge collapsed : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर एक दुर्घटना घडली आहे. या स्थानकावर रेल्वे फुटओवर ब्रिजचा (footover bridge) स्लॅब (Slab collapsed) अचानक कोसळला. हा स्लॅब कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत.  यामधील जखमी प्रवाशांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

काजीपेठ पॅसेंजर स्थानकावर येणार असल्याने प्लॅटफॉर्म प्रवाशांनी भरून होता. काही प्रवाशांना ओव्हरहेड वायरच्या अतिउच्च दाबाचा स्पर्श झाल्याने त्यांना गंभीर इजा झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीये. बल्लारपूर रेल्वे स्थानकाचे अधिकारी कर्मचारी या सर्व जखमी प्रवाशांना मदत करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, या फुटओवर ब्रिजची उंची जवळपास 60 फूट होती. याचाच अर्थ अपघात झाला त्यामुळे लोकं 60 फूटांवरून थेट रेल्वे ट्रॅकवर पडले. काजीपेठ पुणे एक्स्प्रेस पकडण्यासाठी अनेक प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून 4 कडे जात होते. त्याचवेळी अचानक या पुलाचा काही भाग कोसळला. 

या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून हा अपघात किती गंभीर आहे हे स्पष्टपणे दिसतंय. 

रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या इतरांनी जखमींना उचलण्यासाठी तातडीने रेल्वे रुळावर जाऊन त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी आणलं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. यावेळी सर्व जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात नेलं.

Tags: