Mumbai Crime News: फसवणुकीच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. आता मात्र, मुंबईत एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंत्रालयातुन प्रसिद्ध होणाऱ्या सरकारी कागदपत्रांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी तसेच बनावट शिक्के मारल्याचे आढळून आले आहेत. या प्रकारामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
मंत्रालयात कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के आढळले आहत. मुख्यमंत्री सचिवालयालाने ही बाब निदर्शनास आणून दिली. यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने तसेच पत्र पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयातील विविध खात्यांमधुन तसेच ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयाकडे अंतिम मंजुरीसाठी येत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. यावरून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याचे आमिष दाखवून आमदारांकडे 100 कोटींची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. खंडणीखोरांकडून आमदार राहुल कुल यांना हे आमिष देण्यात आलं होते. मात्,र कुल यांच्या खाजगी सचिवाने तातडीने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये सापळा लावण्यात आला...आरोपी रियाझ शेख हा मुख्य सूत्रधार आहे...यासोबत त्याचे साथीदार योगेश कुलकर्णी, सागर सगवाई आणि जाफर उस्मानीला अटक केलीय.