कराड-चिपळूण मार्ग बासनात, आता वैभववाडी-कोल्हापूरचा पर्याय

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कराड चिपळूण, असा कोकण रेल्वेला पर्यायी मार्ग बांधण्याचं निश्चित झालं होतं. पण सरकार बदलल्यावर वैभववाडी कोल्हापूर मार्गाचा पर्याय पुढे आला.

Updated: Nov 16, 2017, 09:46 PM IST
कराड-चिपळूण मार्ग बासनात, आता वैभववाडी-कोल्हापूरचा पर्याय title=
संग्रहित छाया

मुंबई : पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कराड चिपळूण, असा कोकण रेल्वेला पर्यायी मार्ग बांधण्याचं निश्चित झालं होतं. पण सरकार बदलल्यावर वैभववाडी कोल्हापूर मार्गाचा पर्याय पुढे आला.  कराड - चिपळूण हा कोकण रेल्वेला जोडणारा मार्ग बासनात गुंडाळण्यात झालाय. 

राजकीय सत्तांतर झाले आणि...

राजकीय सत्तांतर झाले की निर्णयांची प्रथमिकता बदलते. तसंच कोकण रेल्वेला पर्यायी रेल्वेमार्ग निवडताना झालं आहे. अनेकदा कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यावर कोकणात जाणा-या किंवा कोकण रेल्वेमार्गे दक्षिणेत जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर मोठा परिणाम होतो. यासाठी पूर्व पश्चिम असा कोकण रेल्वेला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचा पर्याय गेली अनेक वर्षे चर्चेत आहे. 

प्रकल्पाचा खर्च हा ३००० कोटींच्या घरात

वैभववाडी - कोल्हापूर रेल्वे प्रकल्पाचा खर्च हा ३००० कोटींच्या घरात आहे.  एकूण १०७ किमी अंतर असणार आहे. या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. 

पूर्व - पश्चिम भागांना जोडणारे कमी अंतरावरचे दोन रेल्वे प्रकल्प होणे ही अशक्य गोष्ट आहे. म्हणूनच राजकीय स्थित्यंतर झाल्यावर वैभववाडी - कोल्हापूर प्रकल्पासमोर कराड - चिपळूण प्रकल्पाने गाशा गुंडाळला आहे असं म्हंटलं तर चुकीचे होणार नाही.

निर्णय घेतांना घोळांत घोळ

निर्णय घेतांना घोळांत घोळ आणि वेळकाढूपणा गेला गेला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना कराड - चिपळूण रेल्वे मार्ग करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, आता कराड - चिपळूण १०३ किमीचा रेल्वे मार्ग असणार आहे. प्रकल्प किंमत ३००० कोटी पेक्षा जास्त असून रेल्वेने प्रकल्प आराखडा तयार केलाय.

रेल्वेकडून फारशी हालचाल नाही

सुरुवातीला प्रकल्पाच्या खर्चामध्ये रेल्वे - राज्य सरकार ५० -५० टक्के वाटा घेणार होती. मात्र नंतर रेल्वेकडून फारशी हालचाल झाली नाही. केंद्र आणि राज्यात २०१४ ला सत्ताबदल झाला आणि हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. रेल्वेने कराड - चिपळूण रेल्वे प्रकल्प करण्याबाबात खासगी संस्थेशी करार केला होता.  मात्र कराड - चिपळूण प्रकल्पातून अचानक खाजगी संस्थेने प्रकल्पातून अंग काढून घेतले. त्यामुळे आता वैभववाडी - कोल्हापूर रेल्वे मार्ग करण्याचा निर्णय झालाय.

या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया 

केंद्र आणि राज्य सरकार विशेष कंपनी स्थापन करत हा प्रकल्प मार्गी लावणार आहेत.लवकरच या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. वैभववाडी - कोल्हापूर रेल्वे मार्गाचा कोकणातील बंदरांना मोठा फायदा होईल, असा दावा करण्यात आलाय.