विशाल करोळे, झी मीडिया, जळगाव : वैद्यकीय क्षेत्रासंबंधी मोठी बातमी समोर आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस (Cut Practice In Medical Field) बंद करण्याची गरज आहे. त्याबाबत नव्यानं कायद्याची गरज आहे असं मोठं विधान वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Medical Education Minister Girish Mahajan) यांनी केले आहे. कट प्रॅक्टिस ही वैद्यकीय क्षेत्राला लागलेली कीड आहे असंही महाजन यांनी म्हटल आहे. कट प्रॅक्टिसविरोधात लवकरच कायदा आणणार असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटल आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस बाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. या कट प्रॅक्टिसची पाळंमुळं फार खोलवर रुजलेली आहेत. वैद्यकीय क्षेत्राला लागलेली ही किड आहे, ती मुळासकट उपटून फेकणे गरजेचं असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणाले.
या आधी 2017 मध्ये सुद्धा कायदा करण्याचे प्रयत्न झाले आहेत. महाराष्ट्र प्रिवेंशन कट प्रॅक्टिस ऍक्ट 2017 मध्ये होणार होता. त्यातील प्रस्तावित तरतुदीनुसार 50 हजार दंड, आणि पाच वर्षांची शिक्षा अथवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा दोषी डॉक्टरांना होऊ शकते. 2017 मध्ये आय एम ए ने सुद्धा या कायद्याला विरोध केला होता. यातून डॉक्टरांना त्रास देण्यात येईल असं डॉक्टर संघटनेचे म्हणणं होते.
कट प्रॅक्टिस म्हणजे काय आणि ती कशी देतात?