मुंबई : महापालिकेचे कर्मचारी नारायण राणे यांच्या 'अधिश' बंगल्यावर कारवाई करत होते. त्याचवेळी राणे यांनी एक ट्विट करून शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे. नुकतेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावरून राणे यांनी हे ट्विट केलंय.
महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नाही व तेलंगणा म्हणजे भारतही नाही. भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार आहे व भाजपचे ३०१ खासदार आहेत. तुम्ही (तेलंगणा) आम्ही (शिवसेना) भाऊ भाऊ, मिळेल ते मिळून खाऊ!
सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले तर त्याचा समुद्र तयार होत नाही. दाक्षिणात्य लोकांच्या विरोधात शिवसेना पूर्वी एक घोषणा देत होती.
हटाव लुंगी
बजाव पुंगी!
आता आम्ही (शिवसेना) व तेलंगणा भाऊ भाऊ काय.. अजब परिवर्तन!— Narayan Rane (@MeNarayanRane) February 21, 2022
सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले तर त्याचा समुद्र तयार होत नाही. दाक्षिणात्य लोकांच्या विरोधात शिवसेना पूर्वी एक घोषणा देत होती.
"हटाव लुंगी, बजाव पुंगी!" पण, आता आम्ही (शिवसेना) व तेलंगणा भाऊ भाऊ... काय.. अजब परिवर्तन आहे अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.