गंडवणाऱ्या दलालांना शेतकऱ्यांनी दिला चोप

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गंडविणाऱ्या व्यापारी, दलालांना धुळे जिल्ह्यात चांगलाच मार खावा लागला आहे.

Updated: Jan 23, 2018, 11:20 AM IST
गंडवणाऱ्या दलालांना शेतकऱ्यांनी दिला चोप  title=

धुळे : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गंडविणाऱ्या व्यापारी, दलालांना धुळे जिल्ह्यात चांगलाच मार खावा लागला आहे.

जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात, कापूस मोजून घेत असताना हे दलाल रिमोटच्या साहाय्याने क्विंटलमागे २० किलो कापसाची हेराफेरी करत असल्याचे लक्षत येताच शेतकऱ्यांनी या बदमाशांना चांगलंच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले.

या प्रकरणी वजनकाट्याच्या तपासणीचे कामी सुरु आहे. या वजनकट्यात दोष आढळ्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.