नागपूर : नागपूर शहरात नामांकित कंपनीच्या रिकाम्या, पण नामांकित सौंदर्य प्रसाधनांच्या बाटल्यांमध्ये, बनावट सौंदर्यप्रसाधनं भरुन बाजारात विकणाऱ्या टोळीचा अन्न आणि औषध प्रशासन तसंच नागपूर पोलिसांनी भांडाफोड केला आहे.
नागपुरातील बजेरिया इथल्या इमारतीच्या चौध्या माळ्यावर हा गोरखधंदा गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सुरु होता. यात बनावट सौंदर्य प्रसाधनं बनवण्यासाठी काही तरूणही काम करत असताना दिसून आले.
नामांकित कंपन्यांचे शाम्पू, बॉडी लोशन, मॉईश्चराईझर सारख्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा समावेश आहे. ब्युटी पार्लर, सलून, झोपडपट्टी आण ग्रामीण भागात ही बनावट सौंदर्य प्रसाधनं निम्म्या दरात विक्री केले जात होते. केमिकल्स वापरुन हे साहित्य तयार केलं जात होतं.