पुणे : मतदारांना आकर्षिक करण्यासाठी उमेदवार काय काय कल्पना लढवतील, याचा विचार न केलेला बरा. कारण शिरूर तालुक्यात रामलिंग गावात रामलिंग पॅनलच्या प्रचारासाठी चक्क क्रिकेटर, टीम इंडियाचा कॅप्टन सारखा दिसणारा हा विराट कोहली आला. रामलिंग पॅनलचं प्रचार चिन्हं देखील बॅट होतं, तेव्हा त्यांनी या विराटला प्रचारासाठी आणलं. बोलवलं, जीपवरून संपूर्ण गावात त्याची हातात बॅट घेऊन रॅली देखील काढण्यात आली, गावकऱ्यांनी विराट सारख्या दिसणाऱ्या या विराट सोबत सेल्फी काढण्याची हौस देखील भागवली. या गावातील पर्यटन स्थळाला देखील विराटने भेट दिली. हुबेहुब विराटसारखा दिसणारा आहे तरी कोण हे खाली वाचा.
हुबेहुब विराटसारखा दिसणारा हा आहे, सौरभ गाडे. सौरभ गाडे हा इंजीनिअर आहे. सौरभ हा देहूचा आहे. सौरभ गाडेचा विराट कोहली, एमएस धोनी, ए बी डिव्हिलिअर्स आणि ब्रॅडम मॅक्यूलम हे माझे आयकॉन असल्याचं सांगितलं, मी देखील क्रिकेट खेळतो, लोक मला विराटसारखा दिसणारा म्हणून प्रेमाने बोलतात, फोटो काढतात, पण जास्त गर्दी झाली तर मला भीती वाटते, मला कार ड्रायव्हिंग, सिंगिंग, स्विमिंग करायला आवडतं, असं सौरभ गाडे याने सांगितलं.
सौरभ गाडे ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आला होता. ते विठ्ठल घावटे लोकनियुक्त सरपंचपदाची निवडणूक लढवत होते, अखेर विठ्ठल घावटे हे रामलिंग लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. विठ्ठल घावटे हे १७०० मतांनी निवडून आले आहेत.