नंदुरबार: वाढत्या पेट्रोल-डिझेलवर ई बाईकचा पर्याय येत आहे. ई बाईक तुलनेनं स्वस्त पडेल या हिशोबाने आता ग्राहकही हळूहळू त्याकडे वळत असल्याचं दिसत आहे. मात्र ई बाईकला दुसऱ्यांना आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे ई बाईकच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह सोशल मीडियावर उपस्थित केलं जात आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथे बॅटरीवर चालणाऱ्या धावत्या ई-बाईकनं पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. वायरिंग स्पार्किंग झाल्यामुळे नवी ई-बाईक जळून खाक झाली. मात्र वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे बाईकस्वारनं रस्त्यावरच गाडी सोडून पळ काढला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.
या दुर्घटनेमध्ये मात्र गाडीत असलेली रोख रक्कम जळून खाक झाल्याचा दावा गाडीच्या मालकानं केला आहे. पेट्रोल महाग झाल्याने शहरातील जुनेद मेमन यांनी ही बाईक खरेदी केली होती. यापूर्वी देखील ई बाईकला आग लागल्याची घटना समोर आली आहे.