दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड आणि अमळनेर तालुके हे दुष्काळसदृष म्हणून जाहीर करावेत, अशी मागणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी केलीय.
यासाठी आपण पहिल्यांदा चार जुलैला पत्र दिलं होतं. तरीही तक्रार मिळाली नसल्याचं सरकार सांगतंय, अशी तक्रार खडसेंनी केलीय. या तीन तालुक्यांत 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असून लोकांनी मरायचं का, असा सवाल त्यांनी सरकारला केलाय.
दरम्यान, केंद्र सरकारचे निकष कडक असून त्यात एकही गाव बसणार नसल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. खडसे बोलतात ते बरोबर आहे,केंद्राचे निकष अधिक कडक आहेत
पण यात एकही गाव बसणार नाही असे नाही, आम्ही गोंदिया जिल्हयातील ३ तालुक्यांत याच निकषावर दुष्काळ जाहीर केला आहे. पण हे निकष बदलावे यासाठी माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, याबाबत अधिवेशन संपल्यावर दिल्लीला जाऊ असे चंद्रकांत पाटील म्हणाले.