२४ तासांनंतर विहिरीत पडलेल्या गव्यांची सुटका

विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर मातीचा गाळ असल्यानं त्यामध्ये हे गवे रुतून बसले होते.  

Updated: Apr 30, 2018, 07:07 PM IST
२४ तासांनंतर विहिरीत पडलेल्या गव्यांची सुटका  title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातल्या भूतलवाडीपैकी बुवाचीवाडी या गावातील एका शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या गव्यांच्या कळपाला वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आलंय. चोवीस तासांपेक्षा जास्त काळ गव्यांना पाण्यात काढावे लागले. शनिवारी  मध्यरात्री विहिरीवर गव्यांचा कळप पाणी पिण्यासाठी आला होता. यावेळी अचानकपणे पाच गवे विहिरीत कोसळले होते.

विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर मातीचा गाळ असल्यानं त्यामध्ये हे गवे रुतून बसले होते.  विहिरीतून बाहेर येण्यासाठी गव्यांची केविलवाणी धडपड सुरू होती. गव्यांचे वजनदेखील अधिक असल्याने त्यांना बाहेर काढणे कठीण झाले होते.

रविवारी सकाळी याठिकाणी जेसीबी मागवून विहिरीचा काही भाग काढून गव्यांना बाहेर येण्यासाठी वाट करण्यात आली. यानंतर हे पाचही गवे विहिरीबाहेर आले.