औरंगाबाद: थ्री इडियट चित्रपट तुम्ही पाहिला असेल. या चित्रपटात जसं अमिर खान व्हॅक्यूमच्या मदतीनं डिलिव्हरी करतो तोच प्रकार प्रत्यक्षात घडल्याचं समोर आलं आहे. व्हॅक्यूमच्या मदतीनं प्रसूती केल्याची घटना कुठे बाहेर नाही तर महाराष्ट्रातील औरंगाबाद इथल्या घाटी रुग्णालयातून समोर आली आहे.
औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात म्हणजे घाटी रुग्णालयात गेल्या 10 महिन्यांच्या काळात व्हॅक्यूम तंत्रज्ञानाचा वापर करीत तब्बल 350 वर प्रसूती करण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या या काळात जिथं सिझर लोकांना सोपं वाटतं आहे. या काळात अजूनही जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करून घाटीतील डॉक्टर्स हे लिलया करत आहेत.
थ्री इडियट चित्रपटातील अमिर खाननं केलेल्या प्रसूतीचा सिन तुम्हाला आठवत असेल. त्यात आमिर खान नायिकेच्या बहिणीची व्हँक्यूम पंपाच्या सहाय्यानं प्रसूती करतो. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात असा प्रकार रोजच होतो आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
वैद्यकीयदृष्ट्या सगळी काळजी घेवून अशा पद्धतीने प्रसूती पार पडते आहे. एरव्ही लोक त्रास नको म्हणून सिझर करतात. मात्र या पद्धतीनं बाळाचा जन्म सहजसोपा होवू शकतो. वेदनारहित प्रसूती होते. जन्मतांना बाऴ अडकले तर या व्हॅक्यूम पंपाच्या सहाय्यानं बाळाला ओढता येतं आणि त्याचा सुरक्षित जन्म होतो.
का केली जाते व्हॅक्यूम प्रसूती ?
प्रसूती कळा सुरु झाल्यानंतर गर्भपिशवीचे तोंड पुर्ण उघडते. त्यातून बाळाचे डोके बाहेर येते. मात्र ही प्रक्रीया अर्ध्यावरच थांबते. या वेळी कुठलीही शस्त्रक्रीयाही करता येत नाही. तेव्हा ही प्रक्रीया अवलंबली जाते.
अगदी सतराव्या शतकापासूनची ही पद्धत आहे. घाटी रुग्णालयात आम्ही हे सहजपणे करतो, असं विभागप्रमुख सांगत आहे.
घाटी रुग्णालयात सिझेरिन शस्त्रक्रियेची टक्केवारी अवघी 28 टक्के आहे. पद्धत जूनी असली तरी ती प्रभावीपणे राबवता येणं गरजेचं आहे. घाटी रुग्णालय नेमकं हेच करतं आहे.