ठाणे : घोडबंदरमधील वर्सोवा पूलाचं भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गड़करी आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.
२५० कोटी रुपये ख़र्च करुन घोडबंदरचा ब्रिज बांधण्यात येणाराय. यावेळी ११०० कोटींच्या आठ पदरी वडपे-ठाणे नवीन रस्त्याची घोषणाही गडकरींनी केली. मुंबईत आता जलमार्ग विकसित झाला पाहिजे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक हायवे करण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला. आगामी काळात मुंबई आणि वसई-विरार विविध मार्गांनी जोडण्याचाही विचार आहे, असं गडकरींनी सांगितलं.