How Identify real organic Alphonso Mangoes : अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2024) सण येऊ ठेपला आहे. गुढीपाडवा म्हणजे हिंदू लोकांचं नवीन वर्ष (Hindu New Year 2024). अशातच यादिवशी घरात श्रीखंडपुरी (Shrikhand), पुरण पोळी किंवा आंब्याचा रस पुरी असा नैवेद्य केला जातो. नवीन वर्ष महाराष्ट्रात घरोघरी विजयाचा गुढी उभारण्यात येते. चैत्र महिन्याचा सुरुवात गुढीपाडव्याच्या सणाने होते. अंगणात रांगोळी, दारात आंब्याच्या पानाचं तोरण आणि मराठी साज...यादिवशी शोभा यात्रा काढण्याची परंपरा आहे. त्यात अजून एक परंपरा म्हणजे गुढी पाडव्याला बाजारात आलेल्या हापूस आंब्याची पहिली पेटी खरेदी करण्याची लगबग. (Going to buy Alphonso Mango on the occasion of Gudi Padwa How Identify real organic Alphonso Mangoes )
हापूस आंबा हा जगभरात प्रसिद्ध आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये बाजारात हापूस आंब्याच्या नावावर लोकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढ आहे. हापूस आंब्यासोबत दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ राज्यातील आंबेही बाजारात मिळत असतात. अशातच तुम्ही जर कोकणी माणूस नसाल तर बाजारात हापूस आंब्याची पेटी खेरदी करताना तुमच्यासोबत फसवूणक होऊ शकते. म्हणून तुम्ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याची पेटी खरेदी करणार असाल तर अस्सल हापूस आंबे ओळखायचे कसे त्याबद्दल जाणून घ्या.
अस्सल हापूस आंब्याचा देठ हा खोल असल्याने तो प्रथम तपासून पाहा.
तर अस्सल हापूस आंबा हा वरच्या बाजूने फुगीर असतो. इतर आंबे हे निमुळते असल्याच पाहिला मिळतात.
अस्सल हापूस आंब्याच्या सुगंध इतर आंब्यापेक्षा अतिशय वेगळा असतो.
अस्सल हापूस आंब्याची साल ही पातळ आहे का ती बघून घ्या.
इतर आंबे बेलग्रीन रंगाचे असतात पण अस्सल हापूस आंबा हा बॉटल ग्रीन रंगाचा असतो.
कर्नाटकी किंवा इतर आंबे हे कापल्यानंतर पिवळ्या रंगाचे दिसतात. तर अस्सल हापूसची ओळख म्हणजे ते कापल्यानंतर केशरी रंगाचे दिसतात.