मुंबई : सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्याच सोनं खरेदी करणे तुम्हाला महागात पडणार आहे. ऎन लग्नसराईच्या मोसमात सोने दरात मोठी वाढ झाली आहे.
२४ कॅरेट सोने दर आज परत ४०० रूपये वाढ प्रति तोळा झाला आहे. काल रेट तोळा ३०, ७०० रूपये होता. आज तो वाढून ३१००० रूपये झाला आहे. नोटबंदी निर्णय केल्यानंतर आज पहिल्यादा आज सर्वांधिक सोने दर वाढलाय.
सोने दर सुमारे एक हजार रुपये प्रति तोळा वाढला आहे. मागील महिन्यात २४ कॅरेट सोने २९ हजार ७०० दर प्रति तोळा होता. त्यानंतर प्रति तोळा दर ३० हजार सातशे झाला होता. सोन्याचा दर गेल्या एका महिन्यात एक हजार रूपये वाढला होता.
आंतराराष्ट्रीय मार्केटमध्ये मागणी आणि दर वाढल्याने राज्यांत सोने भाव वाढला आहे. लग्न विवाह सोहळ्याच्या दिवसात सोने भाव वाढला आहे. देशात मागील वर्षात ७२५ टन सोने आयात केले होते, यंदा यांत वाढ होत देशात ८४६ टन सोने परदेशातून आयात केले.