Gold Silver Price Today in Marathi: सध्या सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचले आहेत. जर आपण सोन्या आणि चांदीच्या दरवाढीकडे बघितले तर अवघ्या दोनच महिन्यामध्ये सोन्याचे भाव तोळ्यामागे 11,000 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 13,000 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीचा गुंतवणूकदारांना काही प्रमाणात फायदा होईल, पण ज्यांच्या घरात विवाहसोहळा आहे, अशा व्यक्तींसाठी सोने-चांदीची दरवाढ डोकेदुखी ठरताना दिसून येत आहे. बरेचजण सोन्यात गुंतवणूक करतात अशा लोकांना प्रश्न पडला असेल की आता सोने खरेदी करावे की अजून काही कालावधीपर्यंत वाट पाहावी?
सोने हा केवळ दागिना म्हणून नाहीतर गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. जेव्हा जागतिक स्तरावर हालचाल वाढते किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते. तेव्हा गुंतवणूकदार सोन्याच्या दिशेने धावतात. दरम्यान काही प्रमाणात रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यानंतर आता इराण-इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम सोनं चांदीच्या दरवाढीवर दिसून येत आहे. या तीन महिन्यांत सोन्याच्या किमतीत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव 74 हजार रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला आहे. विश्लेषकांच्या मते, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाने जागतिक स्तरावर मोठ्या हालचाली निर्माण केल्या आहेत. त्यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडला आहेत.
आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 73,130 रुपये आहे. तर सराफा बाजार वेबसाइटनुसार चांदी 83,850 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 66,908 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 66,908 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 72,990 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 66,908 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 72,990 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 66,908 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 72,990 रुपये आहे.
दरम्यान सोन्या-चांदीच्या वाढत्या दरामुळे सराफा बाजारातील व्यापारी तणावात गेले. यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.