लहानपणी खळखळून हसवणारा शाहिद कपूरचा 'चुप चुप के' ओरिजनल नाहीच, 'या' चित्रपटाची डिट्टो कॉपी!

Shahid Kapoor Chup Chup Ke Movie : शाहिद कपूरच्या 'चुप चुप के' चित्रपट ओरिजनल नाही! नेमक्या कोणत्या चित्रपटाचा आहे रिमेक? 

दिक्षा पाटील | Updated: Feb 11, 2025, 01:07 PM IST
लहानपणी खळखळून हसवणारा शाहिद कपूरचा 'चुप चुप के' ओरिजनल नाहीच, 'या' चित्रपटाची डिट्टो कॉपी! title=
(Photo Credit : Screen Grab)

Shahid Kapoor Chup Chup Ke Movie : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची क्रेझ फक्त भारतात नाही तर परदेशातही आहे. शाहिद कपूरचा फक्त अभिनय नाही तर त्यासोबत त्याच्या डान्सचे देखील लाखो चाहते आहेत. त्यानं आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर त्या चित्रपटांना आज बरिच वर्षे ओलांडली असली तरी देखील त्यांची आजही प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे 'चुप चुप के'. शाहिदच्या या चित्रपटातील भूमिकेनं सगळ्यांना वेड लावलं. त्या चित्रपटात शाहिद या चित्रपटात मुक असल्याचं नाटक करत असल्याचे दाखवण्यात आले. आता तुम्ही विचार करत असाल की हा चित्रपट ओरिजनल नाही यावर तुमचा विश्वास नसेल. पण खरंतर हा चित्रपट रिमेक आहे. हा चित्रपट कोणत्या भाषेतून घेण्यात आला आहे आणि त्याचं नाव काय आज आपण हे सगळं जाणून घेऊया... 

खरंतर, शाहिद कपूरचा 'चुप चुप के' हा चित्रपट 'पंजाबी हाऊसचा रिमेक आहे. आता तुम्हाला नाव वाचून असं वाटत असेल की हा एक पंजाबी चित्रपट आहे. तर असं नसून हा एक मल्याळम चित्रपट आहे. 'पंजाबी हाऊस' हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. या कॉमेडी, ड्रामा चित्रपटानं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. रफी - मेकार्टिन या पटकथा लेखक आणि दिग्दर्शकानं मिळून हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी रफी - मेकार्टिन यांना जवळपास 1 वर्ष लागलं. खरंतर, या चित्रपटाची पटकथा ही त्यांना आलेल्या एका अनुभवावर आधारीत आहे. त्यांना ट्रेननं प्रवास करत असताना हा अनुभव आला होता. त्यावरून त्यांनी याच विषयावर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

नेमकी पटकथा कशी सुचली?

रफी आणि मेकार्टिन हे दोघं रेल्वेनं प्रवास करत असताना त्यांनी सकाळी नाश्त्यासाठी काही घेतलं. त्यानंतर त्यांना जाणवलं की ते जेवण हे खराब झालं आहे आणि त्याच्या दुसऱ्याच क्षणी त्यांनी ते बाहेर टाकून दिलं. त्यांनी काही तरी खायचं फेकलंय हे पाहून शाळेच्या गणवेशात असलेला मुलगा ते उचलण्यासाठी धावला. आता जेवण खराब आहे हे माहित असल्यामुळे रफी आणि मेकार्टिन या दोघांनी त्याला ते घेऊ नको असा सल्ला दिला. या सगळ्या परिस्थितीतून पळून जाण्यासाठी त्या मुलानं मुक असल्याचं नाटक करत ते जेवण घेऊन तिथून पळून जाणं पसंत केलं. हे पाहता रफी आणि मेकार्टिन यांनी अभिनेता मोहनलाल यांना डोक्यात ठेवून  विचार केला होता. त्यांनी केलेल्या विचारानुसार सुपरमार्केटमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला जी तिथे मुकबधिर असल्याचं नाटक करते तिला एक पुरूष आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी ही फक्त एक छोटी कथा होती जिच्यावर काम करता येऊ शकतं असं त्यांना वाटलं होतं. त्यानंतर ही पटकथा पूर्णपणे तयार करण्यासाठी त्यांना जवळपास 9 ते 11 महिने लागले. 

'चुप चुप के' या चित्रपटात जिथे गुजराती कुटुंब दाखवलं आहे. तसं 'पंजाबी हाऊस' या चित्रपटात एक पंजाबी कुटुंब दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट 25 सप्टेंबर 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. इतकंच नाही तर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद देखील मिळाला होता. त्यावेळी हा चित्रपट जवळपास 150 दिवस थिएटरमध्ये सुरु होता. पंजाबी हाऊस हा मल्याळम भाषेत असलेला एक कल्ट सिनेमा आहे. आजही प्रेक्षकांमध्ये या कॉमेडी चित्रपटावरून चर्चा होत असल्याचे पाहायला मिळते. 

हेही वाचा : रणवीर अलाहबादियाला कॉमेडीयन म्हटल्याने सुनील पाल संतापून म्हणाला, 'त्यांना दहशतवाद्यांसारखं...'

आता 'पंजाबी हाऊस'चा रिमेक फक्त हिंदीत करण्यात आला नाही तर त्याआधी 1999 मध्ये तेलगू भाषेत 'मा बालाजी' या नावानं या चित्रपटाचा रिमेक बनवण्यात आला. त्याशिवाय कन्नड भाषेत रिमेक करण्यात आला होता. हा चित्रपट याच नावानं 2002 मध्ये प्रदर्शित झाला. तर 2006 मध्ये 'चुप चुप के' हा चित्रपट प्रदर्शित झाला.