चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : अजूनही लोकांमध्ये भूतदया शिल्लक आहे याची प्रतिची आणणारी घटना बदलापुरमध्ये(Badlapur) घडली आहे. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे विजेच्या खांबावरील(electric wire ) मांज्यात अडकलेल्या कबुतराची(pigeon) सुखरूप सुटका झाली आहे. येथील नागरिक अंधारात राहिले पण कबुतराचा जीव वाचवला.अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कबुतराची सुटका केली(Bird Rescue). बदलापुरकरांच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बदलापूर पश्चिमेकडील मोहनानंद नगर परिसरातील एका विजेच्या खांबावर मांज्यात अडकलेल्या कबुतराची अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने सुखरूप सुटका केली. जवळपास तासभर हे कबूतर येथे अडकून पडले होते.
शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एक कबूतर विजेच्या खांबावर अडकलेला अवस्थेत नागरिकांना दिसले. त्यानंतर नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला. अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने विद्युत पुरवठा खंडित करून कबुतराची सुखरूप सुटका केली. या कबुतराच्या पायाला मांजा अडकल्याने त्याचा पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केले. आता ते कबूतर सुखरूप आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या परिवहन सेवेच्या ड्राव्हरने दोन तास बस थांबवून एका मांजराच्या पिल्लाचा जीव वाचवला. बुधवारी सकाळी 11 च्या सुमाराला टीएमटीची बस ब्रम्हांड बस स्टॉपमधून निघत होती. अनेक प्रवासी या बसमध्ये बसले होते. त्याचवेळी बसच्या पुढच्या चाकात मांजराचं एक पिल्लू अडकल्याचं बस ड्रायव्हरच्या निदर्शनास आले. त्यानं ताबडतोब बस थांबवत अडकलेलं पिल्लू काढण्याचा प्रयत्न केला. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी या मांजराच्या पिलाचा जीव वाचवला. यासाठी बस तब्बल दोन तास एकाच जागेवर थांबली होती. ड्रायव्हरच्या या कृतीचे सवर्त्र कौतुक होत आहे.
सध्या पंतग उडवण्याचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र, पतंग उडवण्याची हौस पक्षांच्या जीवार बेतत आहे. नॉयलॉन मांजा वापरण्यावर बंदी असताना अनेक जण सर्रासपणे या मांजाचा वापर करतात. मात्र, या मांझामध्ये अडकून हजारो पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. तर, हजारे पक्षी या मांजामध्ये अडकून जखमी होतात. अनेक पक्षांचे पंख छाटले जातात. तर काही पक्षांच्या माना कापल्या जातात. यामुळे अनेक पक्षी हे गंभीर होतात.