दुष्काळग्रस्त मराठवाड्यात शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघड

 सात बारा, आठ उताऱ्यासाठी तलाठी शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. 

Updated: Sep 27, 2018, 12:41 PM IST
दुष्काळग्रस्त मराठवाड्यात शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघड  title=

औरंगाबाद : मराठवाड्यात आधीच दुष्काळाची परिस्थिती, त्यात पिककर्जासाठी शेतकरी कागदाची जुळवा-जुळवी करत असताना,  सात बारा, आठ उताऱ्यासाठी तलाठी शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. वैजापूर तालुक्यातील बोरसर गावातील ही घटना आहे. संजय काथार असे त्या तलाठ्याचे नाव आहे.

ग्रामीण भागात लूट 

बँकेत पीक कर्ज मिळविण्यासाठी सातबारा, आठ उतारा आणि फेरफार नक्कल आदी कागदपत्रे आवश्यक असल्याने शेतकरी तलाठ्याकडे गेला असता  तलाठ्याने वरील कागदपत्रे दिल्यानंतर शेतकऱ्याला 150 रुपयांची मागणी केली. शेतकऱ्याने रीतसर पावती मगितल्यानंतर मात्र तलाठी काथार याने स्टेशनरीसाठी लागतात असे सांगत पावती देण्यास नकार दिल्याचे व्हिडिओत स्पष्ठ झाले. ग्रामीण भागात अशी लूट सुरू असेल तर नक्कीच दुर्दैवी चित्र म्हणावे लागेल.