नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालन्यातील गोंदेगाव येथे प्रेमी जोडप्याला मारहाण करणाऱ्या आरोपींच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. याआधी आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडून सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्यानंतर आज चारही आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा मोबाईल तपास बाकी असल्याचं सांगून एका आरोपींच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ देण्याची मागणी केली.
त्यानंतर तिसऱ्या दिवाणी न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्याचा निर्णय दिला.
टोळक्याकडून प्रेमीयुगुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होतो आहे. जालना जिल्हा वकील संघाने देखील या घटनेचा निषेध नोंदवला आहे. प्रेमी जोडप्याला मारहाण करणाऱ्या आरोपींचं वकीलपत्र घ्यायचं नाही अशा प्रकारचा ठराव घेण्याच्या तयारीत असल्याचं जिल्हा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.
याप्रकरणी उपविभागीय पोलिसांनी तपास सुरू केला असून एकाला ताब्यात घेतल्याची देखील माहिती मिळत आहे. हे प्रेमीयुगुल बुलढाण्यातील असल्याची माहिती आहे. ते जालन्यामध्ये गोंदेगाव शिवारात आले असताना इथल्या स्थानिकांनी त्यांना मारहाण केली.
नागरिकांनी कायदा हातात घेणं अत्यंत चुकीचं असल्याची प्रतिक्रिया आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी दिलीय. तर प्रेमी युगुलाला मारहाण करून व्हिडिओ व्हायरल करणं हे कृत्य समर्थनीय नसून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
'डॅशिंग डॉनची, डार्लिंग डीन'; पाहा नव्या भूमिकेत देवदत्त नागे
हिंगणघाट शिक्षिका जळीत कांड : आरोपीच्या घरची मंडळी म्हणतात...
World Cancer Day: कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
हिंमत असेल तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, केजरीवालांचे भाजपला आव्हान
'राहुल मधल्या फळीतच, हे दोघं ओपनिंगला येणार', विराटचं स्पष्टीकरण
दुर्गम भागात तैनात सैनिकांना ना चांगलं जेवण, ना हत्यारं - कॅगचा अहवाल
वनडे सीरिजआधी न्यूझीलंडला धक्का, विलियमसन २ मॅचसाठी बाहेर
'मोदी सरकारने 'सीट डाऊन इंडिया, शटडाऊन इंडिया, शटअप इंडिया' योजना सुरु कराव्यात'