जालना : जालन्यातील परतूर येथील उद्योगपती राजेश नहार यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय.काल मध्यरात्रीच्या सुमारास परतूर तालुक्यातील पोखरी येथे ही घटना घडली.उद्योगपती नहार हे त्यांच्या कारमधून जात असताना अज्ञात मारेकऱ्यांनी कारच्या समोरील बाजूने त्यांच्यावर गोळीबार केला.
या गोळीबारानंतर त्यांना जालन्यातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान या घटनेचं नेमकं कारण समजू शकलेलं नसून पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना चौकशीचे आदेश दिलेत.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.
जालन्यात उद्योजकाची हत्या
मारेकऱ्याकडून गोळ्या झाडून हत्या
उद्योजक राजेश नहार यांची गोळ्या झाडून हत्या https://t.co/HOK58cBO5u pic.twitter.com/oewkcwmMUH— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 12, 2020
अज्ञात मारेकऱ्यांनी नहार यांच्यावर गोळीबार केला. मध्यरात्रीची ही घटना आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस तपासाला वेगाने सुरूवात झाली असून हत्येचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.
राजेश नहार हे परतूर शहरातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. परतुरमध्ये त्यांचा कापसावर प्रक्रिया करणारा जिनिंग व्यवसाय आहे. जालन्यातील बिल्डर गौतम सिंग मुनोत आणि उद्योगपती विमलराज सिंगवी यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी राजेश नहार यांच्यासह एका आरोपीला 2 महिन्यापूर्वी अटक झाली होती. त्यानंतर नहार यांना अटक होऊन त्यांची जामिनावर सुटका झाली होती. उद्योगातील स्पर्धेतूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे.