Maharashtra politics मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरुद्ध विनयभंगांचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आव्हाड यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. या सर्व घडामोडी नंतर राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. जाहीर पत्रकार परिषद घेत आव्हाड यांच्याविरोधात षड् यंत्र रचले जात असल्याचा आरोप करत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
कायदे आपण कुणावर अन्याय होऊ नये म्हणून करत असतो. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस दबावाखाली वागत आहेत. सरकार बदलेलं आहे. विरोधकांचं आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासमोर हा हा सर्व प्रकार घडला असताना कुणीही याबाबत काहीच का बोलत नाही असा सवाल अजित पवार यांनी उपसस्थित केला आहे.
1999 ते 2014 लागोपाठ 15 वर्षे सत्तेत होतो. गृहमंत्रालय आमच्याकडे होते. मात्र, आम्ही चुकीच्या पद्धतीने वागलो नाहीत. माजी मंत्र्यावर दोन दोन गुन्हे दाखल होतात. या मागचा खरा सुत्रधार कोण याचा शोध घेतला पाहिजे.
72 तासांत माजी मंत्र्यावर दोन गुन्हे दाखल होतात. शाहू फुले आंबडेकर यांचे विचार पुढे नेणारा आमचा हा सहकारी आहे. सगळीकडे व्हिडिओ क्लिप फिरते आहे, कुठेही विनयभंग झालेला दिसत नाही.
सरकार बदलले म्हणून जर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे असल्याचे अजित पवार म्हणाले. महाराष्ट्रत असा राजकारण होत असेल तर संविधान लोकशाही या सगळ्याला तिलांजली दिल्यासारख आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत या संदर्भात सखोल चर्चा केली आहे.
राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घातले पाहिजे. कायद्याचा आधार घेऊन निष्पाप व्यक्ती वर जर अन्याय होत असेल तर योग्य नाही. पोलीस सुद्धा दबावाखाली वागत आहेत.
विनयभंगचा गुन्हा गुन्हा दाखल करून आव्हाड यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीला अडकविण्याच प्रयत्न झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या पाठशी आहे. एकत्रपणे एकजूट पणे या सगळ्या परिस्थितीला आपण तोंड देऊ असा विश्वास अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला.