Jyotiba chaitra yatra 2023 : जोतिबाच्या नावानं चांगभलं! (kolhapur news) चा गजर, गुलाल खोबऱ्याची उधळणासोबत मानाच्या सासनकाठींचं दख्खनचा राजा डोंगरावर दाखल झाला. लाखो भाविकांमुळे ज्योतिबा डोंगर गुलाबमय झाला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. (maharashtra news)
आज सकाळी पाच वाजता जोतिबाला शासकीय अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर विधिवत रुपात पूजा बांधण्यात आली. दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून मोठी गर्दी झालीय. आज मानाच्या सासनकाठ्यांची पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली जाते. हलगी, पिपाणी, सनई यांच्या सुरांवर सासनकाठ्यां नाचवल्या जातात. या मिरवणुकीतील दुसरं आकर्षण असतं ते हत्ती, उंट, तोफागाडे, भालदार, चोपदार ही मंडळी...हा सोहळा देही याची डोळा अनुभवण्यासाठी भाविक दूरदूर वरुन येतात. (Jotiba Yatra 2023 chaitra yatra at jyotiba SasanTha temple kolhapur maharashtra what is the significance in marathi)
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश प्रसिद्ध असलेली ज्योतिभा चैत्र यात्रेबाबत एक आख्यायिका आहे. केदार विजय या ग्रंथात या यात्रेविषयी सांगण्यात आलं आहे. केदारनाथ हे दुष्टसंहार करुन जेव्हा हिमालयात परत जात होते तेव्हा करवीर निवासिनी अंबाबाई यांनी राहण्याची विनंती केली. वाडी रत्नागिरी या ठिकाणी केदारनाथ थांबले. तेव्हापासून देव जोतिबा अर्थात दख्खनचा राजा या ठिकाणी विराजमान आहेत.
या यात्रेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून सासनकाठ्या या डोंगरावर येतात आणि हे या यात्रेतील सर्वात प्रमुख आकर्षण असतं. जवळपास 30 ते 40 फूट उंचीचे जाड निशाण आणि त्याच्या तळावर जोतिबाचं वाहन घोडा विराजमान असतो. गुलाबाची उधळण करत लोक या सासनकाठ्या खांद्यावर नाचवतात. या नाचवत असताना तोरण्या सांभळणं हे विशेष असतं.
या असंख्य सासनकाठ्यांपैकी 108 काठ्या या मानाच्या असतात. या यात्रेच्यावेळी या मानाच्या काठ्यांना देवस्थान समितीकडून क्रमानुसार मानपान दिला जातो.
संध्याकाळी जोतिबा देवाची पालखी यमाई मंदिराकडे जाते. यानंतर यमाई आणि जमदग्नी यांचा प्रतिकात्मक विवाहसोहळा रंगतो. सर्व विधी पार पडल्यानंतर देवाची पालखी परत येऊन सदरेवर विराजमान होते. त्यानंतर स्तोत्रयुक्त पदांचे गायन, सर्व मानकऱ्यांना पानविडा, तोफेची सलामी दिली जाते. त्यानंतर तीन दिनाच्या या पालखी सोहळ्याची सांगता होते. दरम्यान क्षेत्र जोतिबा येथील ही चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडताना दिसतं आहे.