मुंबई : कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आजही केडीएमसीत ८२९ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या आता ७ हजार ३४१वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात कल्याण-डोंबिवलीत ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या आठवड्याभरापासूनच कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर वाढू लागलेला आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ही ५०० ते ६०० वर असते.
आठवड्याभरातील कल्याण-डोंबिवलीतील रुग्णसंख्या
तारीख | नवे रुग्ण |
२० मार्च, २०२१ | ५९१ |
२१ मार्च, २०२१ | ६५१ |
२२ मार्च, २०२१ | ६८६ |
२३ मार्च, २०२१ | ७११ |
२४ मार्च, २०२१ | ८८१ |
२५ मार्च, २०२१ | ९८७ |
२६ मार्च, २०२१ | ८२५ |
२७ मार्च, २०२१ | ८२९ |
कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहणार आहेत. भाजी मंडईही ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. तसेच हॉटेल-रेस्टॉरंटमध्येही केवळ पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. याशिवाय हॉटेल-रेस्टॉरंटच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.