कोल्हापूर : वारणानगर इथल्या शिक्षक कॉलनीतून कोट्यवधी रुपये लंपास केल्याचा आरोप असणारा, आणि सध्या सीआयडीच्या अटकेत असणारा सांगलीचा तत्कालीन निलंबीत पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे या दोघांच्या दिमतीला एक व्यक्ती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
इतकच नव्हे तर आरोपी घनवट आणि चंदनशिवे यांना ज्या गाडीतुन पन्हाळा कोर्टात आणण्यात आलं, त्याच सीआयडीच्या गाडीतुन तो व्यक्ती उतरताना दिसुन आला. सुरवातीला हा व्यक्ती पोलीस असेल म्हणून सीआयडीच्या गाडीत बसला असेल असं वाटल. पण नंतर मात्र घनवट आणि चंदनशिवे यांची हुजरेगीरी करताना हा व्यक्ती कोर्टाच्या आवारात दिसून आला.
माध्यमाचे प्रतिनीधी चंदनशिवे यांचा फोटा घेण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी तो चंदनशिवेच्या आडवा तो येत होता. एकीकडं सीआयडीचे अधिकारी अटक केलेल्या पोलीस अधिका-यांना कोणत्याही पद्धतीच्या व्ही.आय.पी ट्रीटमेंट दिल जात नाही असा दावा करत आहेत. मग दुसरीकडं सीआयडीच्या गाडीत घनवट आणि चंदनशिवे यांची हुजरीगीरे करणारा व्यक्ती आलाच कसा हा खरा सवाल आहे.
झी मीडियाकडं असलेल्या दृष्य़ामधे तुम्ही पाहु शकता की ज्या गाडीतुन या दोघांना पन्हाळा कोर्टात आणण्यात आलं, त्याच गाडीतून हा व्यक्ती आरामात उतरताना दिसून आला. हा व्यक्ती कोण आहे याची कल्पना सीआयडीच्या अधिका-यांना नव्हती का ? आणि जर होती तर मग घनवट आणि चंदनशिवे यांच्या गाडीत तो आला कसा असे अनेक प्रश्न आता या घटनेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत.