कोपर्डी बलात्कारप्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रीया

मुख्यमंत्र्यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 18, 2017, 05:40 PM IST
कोपर्डी बलात्कारप्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रीया title=

अहमदनगर : संपूर्ण देशभरात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीतल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी झाली आहे. यामध्ये तीनही आरोपींवर गुन्हा सिद्ध करण्यात आला आहे. 

गुन्हा सिद्ध 

कटकारस्थान, बलात्कार आणि खूनाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला आहे. त्यामूळे आरोपींना शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे.

पिडित भगिनीला न्याय 

कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी तिन्ही नराधमांना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवलंय. या निकालामुळे पीडित भगिनीला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिलीय.

जास्तीत जास्त शिक्षा द्यावी 

 अशा नराधमाना शिक्षा मिळाल्यानंतर कुणीही असे कृत्य करण्यास धजावणार नाही आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय. दोषींना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय. 

 उज्ज्वल निकमांचे अभिनंदन 

 खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवल्याबद्दल उज्ज्वल निकम यांचंही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केल आहे. 

शिक्षेची सुनावणी २१ नोव्हेंबर 

आरोप सिद्ध झाल्यानंतर या आरोपींनी फाशीची शिक्षा देण्यात येईल किंवा जन्मठेप यावरील निकाल हा न्यायालयाकडून २१ नोव्हेंबर रोजी सुनावला जाणार आहे.