ठाणे : मुंब्रा बायपासजवळ दरड कोसळलीय. कौसा इथल्या रहमानिया हॉस्पिटलजवळ डोंगरावरील माती वाहून गेल्याने ही दुर्घटना घडलीय. दरम्यान, येथील वाहतूक ठप्प झालेय.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसंच कोणीही जखमी झालेलं नाही. डोंगरावरील माती आणि दगड रस्त्यावर आल्याने मुंब्रा बायपासवर एकेरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे मुंब्रा बायपासवर वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय.