मावळ : दोन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तुंगमध्ये भूस्खलन झाले आहे. तुंग किल्ल्याच्या पायथ्याच्या तुंग गावालगत सुमारे ३०० मीटर लांब भूस्खलन झाल्यामुळे घरावर दरड कोसळून घर जमीनदोस्त झाले आहे.
तुंग गावचेचे रहिवाशी सीताराम पठारे यांचे घर हे किराणा दुकानापासून १०० मीटर अंतरावर आहे. जोरदार आवाज झाल्यानंतर पठारे जेव्हा दुकानातून बाहेर आले तेव्हा त्यांना त्यांचे राहते घर जमिनदोस्त झाल्याचे दिसले. घरावर दरड कोसळून घराची मोठी हानी झाली.
दैव बलवत्तर म्हणून ११ माणसाचे प्राण वाचले. तुंग किल्ल्या लगत अंदाजे ३०० मीटर इतके लांब भूस्खलन झाले असून माळीण दुर्घटने वेळी व मावळ मधील भाजे दुर्घटनेवेळी देखील तुंगमध्ये असे मोठे भगदाड पडले होते. यामुळे गावांमधील नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.