21 Jan 2025, 22:12 वाजता
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजप आग्रही?
Nashik : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपच आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चा झाली आणि यात पालकमंत्रिपद भाजपकडंच ठेवावं अशी चर्चा झाली. विशेष म्हणजे गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजपचं नेतृत्व ठाम असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. नाशिकबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणारेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्रिपद भाजप स्वतःकडंच ठेवण्याची शक्यता आहे.,
21 Jan 2025, 20:25 वाजता
कोल्हापुरात महापालिका कर्मचाऱ्यावर हल्ला
Kolhapur : पाणी कनेक्शन वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला..कोल्हापूरच्या मंगळवार पेठ परिसरातील घटना...बिल भरलं नसल्यानं कनेक्शन बंद करायला गेलेल्या पथकावर हल्ला...हल्यात मीटर रीडर उमेश साळुंखे याना बेदम मारहाण... कर्मचा-यांमध्ये भीतीचं वातावरण
बातमीचा व्हिडीओ पाहा-
21 Jan 2025, 18:30 वाजता
गोंदियात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
Gondia Teacher molest Student : गोंदियाच्या तिरोडा शहरातील नामांकित हायस्कूलमध्ये शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडलीय...हा नराधम शिक्षणक एनसीसी शिक्षक पदावर कार्यरत आहे...शाळेत दहावीत शिकणा-या 15 वर्षीय पीडित मुलीला ऑफिसमध्ये बोलवून अश्लिल चाळे केल्याचा आरोप मुलीने केलाय...घडलेला प्रकार कुणालाही न सांगण्याची धमकीही त्यानं दिली होती..दरम्यान पोलिसांनी या नराधम शिक्षकाला बाललैंगिक अधिनियमान्वये अटक केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
21 Jan 2025, 18:05 वाजता
25 जानेवारीला मनोज जरांगे आमरण उपोषण करणार
Manoj Jarange Patil : 25 जानेवारीला मनोज जरांगे आमरण उपोषण करणार...मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलन करणार...मुख्यमंत्र्यांनी 25 जानेवारी अगोदर आरक्षण द्यावे'...अन्यथा आंदोलन करणार..मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
बातमीचा व्हिडीओ पाहा-
21 Jan 2025, 17:22 वाजता
24 जानेवारीला शिवसेना (UBT) पक्षाची बैठक
Shivsena (UBT) Meeting : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलीय. पक्षानं 24 जानेवारीला मुंबईतील शिवसेना भवन इथं महत्त्वाची बैठक बोलावलीय. या बैठकीला राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसह जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करणारेत. दरम्यान, 23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त अंधेरीत मेळावा होणारेय. या मेळाव्याला जिल्हाप्रमुखांसह मुंबईतील पदाधिकारी उपस्थित राहणारेत. तर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे सर्व जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करणारेत. आगामी महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढाव्या असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मेळाव्याला महत्व आहे.
21 Jan 2025, 16:35 वाजता
अभिनेता सैफ अली खानला लीलावतीतून डिस्चार्ज
Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय...6 दिवसांच्या उपचारानंतर सैफला डिस्चार्ज..डिस्चार्जनंतर सैफ वांद्रेतील फॉर्च्युन हाईटमधील घरी.
21 Jan 2025, 15:06 वाजता
संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आणखी एक सीसीटीव्ही समोर
Santosh Deshmukh Murder Case : बीड खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींचा नवा सीसीटीव्ही समोर आलाय...विष्णू चाटेच्या कार्यालयातील 29 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीचा हा सीसीटीव्ही असल्याची माहिती...याच दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यात आली होती... सीसीटीव्हीमध्ये विष्णू चाटे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे,बालाजी तांदळे, प्रतीक घुले हे सर्वच आरोपी दिसत आहेत...निलंबित पोलीस अधिकारी पाटीलही या सीसीटीव्हीत दिसतोय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
21 Jan 2025, 14:26 वाजता
संभाजीनगरमधील 800 गुंतवणूकदारांची फसवणूक
Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणुकीवर 3 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुजरातच्या क्विक स्टार्ट 24 ग्रुप कंपनीने 800 वर गुंतवणूकदारांकडून 35 कोटी रुपये उकळून कार्यालयाला कुलूप लावून फसवणूक केली असल्याचं समोर आलंय. या कंपनीने एका वर्षासाठी एक लाख रुपये 10 महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा तीन टक्के परतावा मिळेल. त्याचबरोबर परदेशात मोफत सहलीसाठी जाता येईल असे आमिष दाखवून गुंतवणूकदाराना 35 कोटी रुपयांचा गंडा घातला. विशेष म्हणजे या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे नोटरी रजिस्ट्री हे गुजरात मध्ये केले गेले. शहरातील जिन्सी पोलिस ठाण्यात कंपनीचे संचालक हर्षल गांधी, प्रतीक शहा यांच्यासह शाखा व्यवस्थापक शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Jan 2025, 13:41 वाजता
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळांना कोर्टाचा दिलासा
Relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा.. जामीन रद्द करण्याची ईडीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली.. मनी लाँड्रिंगप्रकरणी छगन भुजबळ यांना मोठा दिलासा.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Jan 2025, 13:34 वाजता
गुलेन बॅरी सिंड्रोम आजारामुळे पुणे मनपा सतर्क
Pune Municipality Alert : गुलेन बॅरी सिंड्रोम आजारामुळे पुणे मनपा सतर्क.. पुण्यातील तीन ते चार हॉस्पिटलमध्ये 22 संशयित रुग्ण.. सहा रुग्ण पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असल्याची माहिती.. सॅम्पल्स NIVकडे पाठवण्यात आले.. आरोग्य विभागाने बोलावली तातडीची बैठक.. नेमका हा आजार कसा होतो यावर एक्सपर्ट टीमसोबत बैठकीत चर्चा होणार.
बातमीचा व्हिडीओ पाहा -