Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 21 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Jan 21, 2025, 22:18 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

21 Jan 2025, 13:04 वाजता

रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

 

Raigad Bird Flue : रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. उरण तालुक्यातील चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर आलंय. भोपाळच्या पशुरोग प्रयोग शाळेनं याबाबत धक्कादायक अहवाल दिलाय. जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. प्रशासनानं उपाययोजना सुरू केलीय. खबरदारी म्हणून गावातील 1 हजाराहून अधिक कोंबड्या तसेच अंड्यांची विल्हेवाट लावण्यात आलीय. 1 किलोमीटरपर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. या परिसरातील चिकनची दुकाने 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिलीत. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहनदेखील करण्यात आलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

21 Jan 2025, 12:36 वाजता

भुयारी मार्गासाठी हिरवा कंदील

 

Maval : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील देहूरोड बायपास इथे भुयारी मार्ग होण्यासाठी किवळे ग्रामस्थांच्या 10 वर्षाच्या लढ्याला अखेर यश आलं. कारण इथल्या भुयारी मार्गाला मंजुरी मिळालीय.  या मार्गावर शेकडो जणांचे अपघातात मृत्यू झाले. त्यामुळे देहूरोड, किवळे, ग्रामस्थांनी आंदोलनाचा बडगा उचलला होता. यात अनेक आंदोलनं केली होती. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून या भुयारी मार्गाला हिरवा कंदील मिळाला. त्यासाठी 21 कोटी 71 लाख 48 हजार 101 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा ही काढण्यात आली असून लवकरच भुयारी मार्गाचे काम चालू होणार आहे. 

बातमी पाहा - ग्रामस्थांच्या 10 वर्षांच्या लढ्याला अखेर यश, मुंबई -बंगळुरू महामार्गावर भुयारी मार्ग होणार

21 Jan 2025, 12:17 वाजता

दादा भुसे, भरत गोगावले घेणार एकनाथ शिंदेंची भेट

 

Dada Bhuse, Bharat Gogwale & Eknath Shinde : नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या मंत्र्यांना न मिळाल्यामुळे शिवसेनेचे नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे घोषित केलेले पालकमंत्रिपदाला सध्या स्थगिती दिली. यामुळे नाराज शिवसेना मंत्र्यांना काहीसा दिलासा मिळालाय. आजच्या बैठकीत काय निर्णय होतोय हे आता पाहवं लागणारेय. 

21 Jan 2025, 12:06 वाजता

शिवसेना UBTची 24 जानेवारीला बैठक

 

Shivsena UBT Meeting : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलीय. पक्षानं 24 जानेवारीला मुंबईतील शिवसेना भवन इथं महत्त्वाची बैठक बोलावलीय. या बैठकीला राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसह जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करणारेत. दरम्यान, 23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त अंधेरीत मेळावा होणारेय. या मेळाव्याला जिल्हाप्रमुखांसह मुंबईतील पदाधिकारी उपस्थित राहणारेत. तर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे सर्व जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करणारेत. आगामी महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढाव्या असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मेळाव्याला महत्व आहे.

21 Jan 2025, 11:29 वाजता

महाराष्ट्रातील सरकार दिल्लीतून चालतं, संजय राऊतांची टीका

 

Delhi Sanjay Raut : महाराष्ट्रातील सरकार हे दिल्लीतून चालतं, फडणवीस, शिंदे, अजित पवार ह्या कठपुतळ्या आहेत अशी टीका संजय राऊतांनी केलीय. पालकमंत्रिपदासाठी दंगल सुरू असल्याचंही राऊतांनी म्हटलंय 'दिल्लीत कोण जास्त थैल्या देतं.... त्यानुसार वजन ठरतं'.. असा हल्लाबोल  राऊतांनी सरकारवर केलाय

21 Jan 2025, 10:46 वाजता

बीडमध्ये HIVच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंब वाळीत

 

Beed Family : एकीकडे गुन्हेगारीमुळे बीड जिल्ह्या देशात चर्चेत आहे तर दुसरीकडे आता बीड जिल्ह्याच्या आष्टीमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुरोगामी महाराष्ट्रात आजही अफवांचा बाजार सुरू आहे. या अफवांचा आष्टीमधील एका कुटुंबाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागलाय. बीडच्या आष्टीमधील एका कुटुंबांला HIVच्या अफवेमुळे वाळीत टाकण्यात आलंय. या कुटुंबातील एका मुलीचा मृत्यू झाला, तो मृत्यू HIVमुळे झाल्याची माहिती गावात पसरली आणि गावाने या कुटुंबाला वाळीत टाकलंय. मात्र ही माहिती खोटी असून पोलीस आणि वैद्यकीय अधिका-यांनी अफवा पसरवून कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय. मुलीचे सासरच्यांच्या सांगण्यावरून पोलीस आणि आरोग्य विभागाने अफवा पसरवल्याचं पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे.  कुटुंबाला वाळीत टाकल्याने या कुटुंबातील महिलेनं दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावाही करण्यात आलाय. पीडित कुटुंबाने डॉक्टर आणि पोलिसांची जिल्हाधिका-यांकडे तक्रार दाखल केलीये.

21 Jan 2025, 10:34 वाजता

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ होणार

 

Nawab Malik : एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या बहिणीने  नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस चौकशी करण्याचे व त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार आहेत. मलिक यांनी यास्मिन वानखेडेंवर आरोप केले होते.. कुटुंबावर दबाव आणण्यासाठी मलिक यांनी आरोप केल्याची तक्रार यास्मिन यांनी कोर्टाकडे केलीय.. त्यांच्या तक्राराची दखल घेत कोर्टानं चौकशीचे आदेश देऊन 15 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिलेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Jan 2025, 09:41 वाजता

पहाटेचा शपथविधी कुणाचं षडयंत्र?

 

Chhagan Bhujbal : पहाटेच्या शपथविधी षडयंत्र होतं तर कुणी रचलं?' होतं असा सवाल छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंना विचारलाय.. षडयंत्र उद्धव ठाकरे, काँग्रेसने रचलं नसेल मग ते कुणी चरलं होतं असा सवालही भुजबळांनी उपस्थित केलाय..  सरकार स्थापनेसाठी मविआची बैठक सुरू होती त्या बैठकीत शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात वाद झाला. त्यानंतर शरद पवार बैठकीतून निघून गेल्याचं छगन भुजबळ म्हणालेत.. मात्र  दुसऱ्या दिवशी अजित पवारांना पहाटे शपथ घेताना घेताना टीव्हीवर पहिल्याचंही भुजबळांनी म्हटलंय.. मी शरद पवारांकडे गेलो आपण पुन्हा कामाला लागू असं त्यांना सांगितल्याचं भुजबळ म्हणालते..  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Jan 2025, 09:10 वाजता

पुण्यात गुंडगिरी करणाऱ्यांची धिंड

 

Pune : पुण्यातील कोंढवा परिसरात गुंडगिरी करणा-यांची पोलिसांनी धिंड काढलीय. कॉलेज परिसरात दहशत पसरवणा-या 7 आरोपींना पलिसांनी अटक कली आणि त्यांना चांगलीच अद्दल घडवली. या आरोपींकडून 4 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. पोलिसांच्या या कामगिरीचं नागरिकांतून कौतुक होत आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Jan 2025, 09:06 वाजता

संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास मुंबईतून होणार

 

Beed Santosh Deshmukh Murder Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नेमलेल्या न्यायालयीन चौकशी समितीच्या मुख्यालयाचं ठिकाण बदलंय. चौकशी समितीचं मुख्यालय बीड ऐवजी मुंबईमध्ये असणारेय. चौकशी निःपक्षपातीपणे व्हावी यासाठी हा निर्णय घेतलाय. मुंबई हायकोर्टानं नियुक्त केलेल्या न्यायालयीन चौकशी समितीचे अध्यक्ष एम. एल ताहीलियानी यांनी या चौकशी समितीचे कार्यालय बीड ऐवजी मुंबईमध्ये करण्याची विनंती केली होती. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आलीय. त्यामुळे चौकशी समितीचा सर्व कारभार मुंबई येथून चालणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -