Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 21 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Jan 21, 2025, 22:18 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

21 Jan 2025, 08:23 वाजता

पंढरपूर प्रांत कार्यालयात एसीबीची कारवाई

 

Pandharpur ACB Raid : पंढरपुरात प्रांत कार्यालयातील महसूल सहाय्यकाला लाच घेताना पकडण्यात आलंय. शेत जमीन प्रकरणातील निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी 60 हजारांची लाच मागण्यात आली. दरम्यान यापैकी 55 हजार रुपयांची लाच रक्कम शिपाई मार्फत स्वीकारली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Jan 2025, 08:00 वाजता

अकोल्यात अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

 

Akola Saline Box Seized : अकोल्यात अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली. शहरातील सिव्हिल रोड इथं GMD मार्केटमध्ये दास सर्जिकल प्रतिष्ठानच्या गोदामातून सलाईनचे एक हजार बॉक्स जप्त करण्यात आलेत. गोदामात विनापरवाना सलाईनच्या बॉक्सची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी धाडसत्र राबवत कारवाई केली. यात 40 सलाईन एप्रिल 2025ला एक्सपायर होणार होत्या. कारवाईत 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

21 Jan 2025, 07:57 वाजता

सैफवरील हल्ल्याचं पोलिसांकडून रिक्रिएशन

 

Saif Ali Khan Attack Update : आरोपी मोहम्मदला घेऊन मुंबई पोलीस काल रात्री उशिरा सैफ अली खानच्या घरी आले होते. आरोपी सैफच्या घरी कसा घुसला यांची इंतभुत माहिती पोलिसांनी आरोपीकडून काढून घेतली. सैफच्या घरी आरोपी पाय-यावरून जाताना सीसीटीव्हीत चित्रित झालं मात्र घरापर्यंत आरोपी कसा पोहचला ते जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरी नेलं होतं, दरम्यान रिक्रिएशनंतर आरोपी मोहम्मद शहजादला पुन्हा वांद्रे पोलीस ठाण्यात आणलंय

बातमीचा व्हिडीओ पाहा -