Maharashtra Breaking News Today LIVE Updates:मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कुटुंबात वाद

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील बातम्यांचा वेगवान आढावा जाणून घेऊया या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Mansi kshirsagar | Jan 22, 2025, 15:08 PM IST
Maharashtra Breaking News Today LIVE Updates:मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कुटुंबात वाद

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: बीड प्रकरणावरुन राज्यात सध्या घडामोडींना वेग आला आहे. आजच्या दिवसभरातील वेगवान घडामोडींचा आढावा घेऊया लाइव्ह ब्लॉगमधून

22 Jan 2025, 11:24 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी वाल्मिक कराडवर दाखल असलेल्या मकोका खटल्याची आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. सीआयडीचे अधिकारी कार्यालयात दाखल झालेत. व्हीसीद्वारे कराडला हजर करण्यात येणार आहे. 21 दिवसाची SIT  कोठडी  संपल्यानंतर आज वाल्मीकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

22 Jan 2025, 10:57 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates:  पंतप्रधानांनी नाकारली संभीजी भिडेंची भेट. रायगडावरील कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी भिडे मोदींच्या भेटीला गेले होते. वेळ न मिळाल्यानं संभाजी भिडे सांगलीत परतले

22 Jan 2025, 10:56 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates:  दावोसमध्ये फोडाफोडीचं राजकारण कशाला.उद्योग मंत्र्यांना आधी दावोसमधून माघारी पाठवा, संजय राऊतांची मागणी

 

22 Jan 2025, 10:17 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणातली महत्त्वाची बातमी

नऊ परदेशी आरोपीं विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.टोरेस गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने नऊ परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. त्यात आठ युक्रेनचे व एक तुर्कस्थानचा नागरिक आहे.याप्रकरणातील मुख्य आरोपीने २०० कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी पसार झालेला तौसिफ रियाज उर्फ जॉन कार्टर याचा अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही.या प्रकरणाचा गुंता सोडविण्यासाठी तौफिक सापडणे गरजेचे आहे.त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत असून तो कुठे दिल्यास संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे

22 Jan 2025, 10:16 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates:  सैफवरच्या चाकू हल्ल्यानंतर वांद्रे पोलिस अलर्ट

वांद्रे पोलीस आता उच्चभ्रू सोसायटीतील लोकांना भेटून सुरक्षेबाबत मार्गदर्शन करणारेत. अभिनेता सैफ अली खान वर चाकू हल्ला झाल्यानंतर वांद्रे पश्चिमेतल्या इमारती मधील सुरक्षा तसंच सीसीटिव्हीबाबत वांद्रेतील हाउसिंग सोसायटीशी वरिष्ठ पोलीस अधिकारी चर्चा करणार असल्याची माहिती मिळतेय. वांद्रे पोलिसांनी सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी उच्चभ्रू वस्तीतील रहिवाशांना भेटण्याची योजना आखलीय. 

22 Jan 2025, 09:33 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आज पंढरपूरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे... सकाळी 10 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.. या मोर्चामध्ये मनोज जरांगे, आमदार सुरेश धस आणि देशमुख तसंच सुर्यवंशी कुटुंबीय सहभागी होणार आहेत.

22 Jan 2025, 09:33 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर आजपासून तीन दिवस ट्रॅफीक ब्लॉक. एक्सप्रेस हायवेवर पुलाचे गर्डर्स बसवण्यासाठी  दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक.

22 Jan 2025, 08:52 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सैफवरील हल्ला प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा

अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलीये. पोलीस तपासामध्ये सैफच्या घरात हल्लेखोराचा मास्क पोलिसांना सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.  हल्ल्याच्या दिवशी आरोपीनं हाच मास्क वापरला होता. सैफच्या घरात आरोपीच्या बोटांचे ठसेही आढळून आले असून 19 ठिकाणी आरोपीच्या बोटांचे ठसे सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. आरोपीच्या मोबाईलमधूनही पोलिसांना महत्त्वाची माहिती सापडलीये.. आरोपीनं त्याच्या मोबाईलवरुन  बांगलादेशातील नातेवाईकांशी संपर्क साधला होता अशी माहितीही सूत्रांनी दिलीये

22 Jan 2025, 08:51 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विरोधी पक्षनेतेपदाबाबत दोन-तीन दिवसांत निर्णय

विरोधी पक्षनेतेपदाबाबत दोन तीन दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिलीये. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते बसून हा निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.. तर विधिमंडळ समित्यांबाबत दोन तीन दिवसांत विधानसभा अध्यक्षांची सुद्धा भेट घेणार असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय

22 Jan 2025, 08:50 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: वाल्मीक कराडला आज कोर्टात हजर करणार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी वाल्मिक कराडवर दाखल असलेल्या मकोका खटल्याची आज बीड न्यायालयात सुनावणी होणार आहे. 21 दिवसाची SIT  कोठडी  संपल्यानंतर आज वाल्मीक कराडला पुढील सुनावणीसाठी बीड न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. काल सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींचा एकत्रित व्हिडिओ समोर आल्यानंतर आज होणाऱ्या या न्यायालयीन सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. या व्हिडिओच्या अनुषंगाने आज न्यायालयात काही नवीन बाबी समोर येतात का याकडे सर्वांचेच लक्ष लागलंय. आजच्या सुनावणीनंतर वाल्मीक कराडला एसआयटी कोठडी वाढून मिळते की त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होते याचा फैसला आज होणार आहे.