Maharashtra Breaking News Today LIVE Updates: जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना; एक्सप्रेसने प्रवाशांना उडवले

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील बातम्यांचा वेगवान आढावा जाणून घेऊया या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Mansi kshirsagar | Jan 22, 2025, 18:01 PM IST
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना; एक्सप्रेसने प्रवाशांना उडवले

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात वीज ग्राहक संघर्ष समितीचा भंडारा महावितरणवर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

22 Jan 2025, 08:52 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सैफवरील हल्ला प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा

अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलीये. पोलीस तपासामध्ये सैफच्या घरात हल्लेखोराचा मास्क पोलिसांना सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.  हल्ल्याच्या दिवशी आरोपीनं हाच मास्क वापरला होता. सैफच्या घरात आरोपीच्या बोटांचे ठसेही आढळून आले असून 19 ठिकाणी आरोपीच्या बोटांचे ठसे सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. आरोपीच्या मोबाईलमधूनही पोलिसांना महत्त्वाची माहिती सापडलीये.. आरोपीनं त्याच्या मोबाईलवरुन  बांगलादेशातील नातेवाईकांशी संपर्क साधला होता अशी माहितीही सूत्रांनी दिलीये

22 Jan 2025, 08:51 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विरोधी पक्षनेतेपदाबाबत दोन-तीन दिवसांत निर्णय

विरोधी पक्षनेतेपदाबाबत दोन तीन दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिलीये. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते बसून हा निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.. तर विधिमंडळ समित्यांबाबत दोन तीन दिवसांत विधानसभा अध्यक्षांची सुद्धा भेट घेणार असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय

22 Jan 2025, 08:50 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: वाल्मीक कराडला आज कोर्टात हजर करणार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी वाल्मिक कराडवर दाखल असलेल्या मकोका खटल्याची आज बीड न्यायालयात सुनावणी होणार आहे. 21 दिवसाची SIT  कोठडी  संपल्यानंतर आज वाल्मीक कराडला पुढील सुनावणीसाठी बीड न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. काल सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींचा एकत्रित व्हिडिओ समोर आल्यानंतर आज होणाऱ्या या न्यायालयीन सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. या व्हिडिओच्या अनुषंगाने आज न्यायालयात काही नवीन बाबी समोर येतात का याकडे सर्वांचेच लक्ष लागलंय. आजच्या सुनावणीनंतर वाल्मीक कराडला एसआयटी कोठडी वाढून मिळते की त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होते याचा फैसला आज होणार आहे.

22 Jan 2025, 08:18 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: बीड प्रकरणावरुन अंजली दमानियांचे पोलिसांवर गंभीर आरोप

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. 3 जुलै 2024ला वाल्मिक कराडविरोधात FIR दाखल झाली होती मात्रा चार्चशीटमधून त्याचं नाव वगळण्यात आल्याचा दावा दमानियांनी केलाय.. या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी त्यांनी केलीये. यासंदर्भात दमानियांनी ट्विट केलंय.

22 Jan 2025, 07:08 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा राहणार बंद

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी. गुरुवारी शहरातील अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा राहणार बंद. तर शुक्रवारी कमी दाबाने होणार पाणीपुरवठा. पुणे महानगरपालिकेद्वारे शहरात जलवाहिनीचे काम करण्यात येणार असल्याने शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा राहणार पूर्णपणे बंद. उद्या कात्रज ,स्वारगेट, महर्षी नगर सह अनेक पेठांमधील पाणीपुरवठा बंद

22 Jan 2025, 07:07 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: शक्तिपीठ महामार्गासाठी लातूर जिल्ह्यात 500 हेक्टर भूसंपादनाच्या कामाला वेग

लातूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. निवडणुकीच्या काळात शक्तिपीठ महामार्ग हा रद्द झाल्याचे सांगण्यात आलं पण आता परत एकदा प्रशासनाकडून शक्तीपीठाच्या महामार्गासाठी हालचाली सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

22 Jan 2025, 07:06 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: उरणमधील चिरनेर गावात बर्ड फ्लूचा शिरकाव

उरण तालुक्यातील चिरनेर गावात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून. आठवड्या भरापूर्वी चिरनेर गावात काही कोंबड्या मृत पावल्या होत्या. या मृत कोंबड्यांचा नमुना तपासणीसाठी पुणे व मध्य प्रदेश मधील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. पाठवण्यात आलेल्या या नमुन्यामधुन कोंबड्या या बर्ड फ्लू या आजाराने मृत पावल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय.

22 Jan 2025, 07:06 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: वाशिमच्या कारंजा-पोहा रोडवर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कारंजा पोहा रोडवरील तुळजापूर धरणाजवळ ऑटो रिक्षा आणि पिकअप गाडी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 12 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय