Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सैफ अली खान प्रकरणातील तपास अधिकारी बदलला

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रासहीत भारत आणि परदेशातील लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी

Swapnil Ghangale | Jan 21, 2025, 21:11 PM IST
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सैफ अली खान प्रकरणातील तपास अधिकारी बदलला

21 Jan 2025, 21:09 वाजता

सैफ अली खान प्रकरणातील तपास अधिकारी बदलला 

सैफ अली खान प्रकरणातील तपास अधिकारी बदलला आहे. पहिल्या प्रकरणाचे तपास अधिकारी पीआय दर्जाचे अधिकारी सुदर्शन गायकवाड होते. तपास अधिकारी बदलण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अजय लिंगनूरकर यांना नवीन तपास  अधिकारी नियुक्त करण्यात आलं आहे.

21 Jan 2025, 20:47 वाजता

उद्योगमंत्री उदय सामंत यांचं ट्वीट -

दावोस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी JSW ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदल यांच्या सोबत 3 लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक सामंजस्य करारावर सही केली! या महत्त्वपूर्ण करारामुळे:
- गडचिरोलीत अत्याधुनिक, ग्रीन 25 मिलियन टन स्टील प्लांट
- छत्रपती संभाजी नगरमध्ये ग्रीन मोबिलिटीवर लक्ष, इलेक्ट्रिक बस, ट्रक आणि परवडणाऱ्या EVs
- पेट्रोल पंपांवर फास्ट चार्जिंग सुविधा आणि राज्याच्या ट्रान्समिशन नेटवर्कचे पुनर्मूल्यांकन
- विविध क्षेत्रात 10,000 लोकांसाठी रोजगार निर्मिती
अशा महत्वपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक होणार आहे. 
महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगती, नवीकरणीय ऊर्जा आणि रोजगार निर्मितीसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा आहे.

21 Jan 2025, 19:57 वाजता

दावोसमध्ये तीन दिवसांत महाराष्ट्रासाठी 3 लाख 82 हजार कोटींचे सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी बंपर गिफ्ट मिळालं आहे. तीन दिवसांत महाराष्ट्रासाठी 3 लाख 82 हजार कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत. गडचिरोलीत जेएसडब्ल्यू ग्रुपकडून ३ लाख कोटींची गुंतवणूक करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.  गडचिरोलीत ह्या गुंतवणुकीतून जवळपास 10 हजार रोजगार निर्मिती शक्य होणार आहे. 

मुख्यमंत्र्यांकडून स्टील, रिन्युएबल एनर्जी, इन्फ्रा आणि सिमेंट, लिथियम बॅटरी आणि सोलर संदर्भात गुंतवणूकीवर भर देण्यात आला आहे. तसेच राज्यात वारे एनर्जी ह्या हरित ऊर्जा कंपनीकडून 30 हजार कोटींची गुंतवणूक ; 7 हजार 500 रोजगार निर्मिती होणार आहे. टेम्बो कंपनीची देखील 1 हजार कोटींची गुंतवणूक असून 300 रोजगार निर्मिती होईल. 

21 Jan 2025, 18:28 वाजता

वाल्मिक कराडला उद्या कोर्टात हजर करणार

वाल्मिक कराड याच्यावर दाखल असलेल्या मकोका खटल्याप्रकरणी उद्या बीड न्यायालयात सुनावणी

सात दिवसाची एसआयटी कोठडी संपल्यामुळे उद्या बीड न्यायालयात करणार हजर

सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होण्याची शक्यता

वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळणार का याकडे लक्ष.

21 Jan 2025, 17:50 वाजता

पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाला काका पुतणे येणार एकत्र

पुण्यातील व्हीएसआयमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार एकाच मंचावर दिसणार

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवार्षिक सभा व पारितोषिक वितरण समारंभ 23 जानेवारी रोजी होणार*

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार सभा आणि पारितोषिक समारंभ

उपमुख्यमंत्री अजित पवार, बाबासाहेब पाटील आणि वी एसआयचे विश्वस्त दिलीप वळसे पाटील राहणार उपस्थित

ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार, संस्थेतील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार

या समारंभाला राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार सुद्धा देण्यात येणार

21 Jan 2025, 16:35 वाजता

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला अखेर डिस्चार्ज, हल्ल्याच्या 5 दिवसांनी परतणार घरी

21 Jan 2025, 16:23 वाजता

दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी

महाराष्ट्र सरकारचा कल्याणी समूहाशी करार

स्टील आणि संरक्षण क्षेत्रात करार
पोलादसाठी 5200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीत

4000 रोजगार निर्मिती

अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत केला करार

पहिल्या 1 तासात 3 MOU 

38,750 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात

दावोसमध्ये आजचा आणि उद्याचा दिवस महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा

कल्याणी समूह: 5200 कोटी
रिलायन्स इन्फ्रा: 16,500 कोटी
बालासोर एलॉय: 17,000 कोटी

21 Jan 2025, 16:18 वाजता

शिवसेनेचा दिल्ली निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा मोठा निर्णय

शिवसेनेचा दिल्ली निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा
 
युती धर्माचे पालन करत शिवसेनेची भाजपला साथ

शिवसेना दिल्ली राज्य प्रमुख संदिप चौधरी यांनी दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांची भेट घेतली

शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपा अध्यक्ष श्री जे पी नड्डा यांना पाठवले समर्थनाचे पत्र
   
शिवसेनेने यापूर्वी दिल्लीची निवडणूक लढवली होती मात्र यंदा भाजपला पाठिंबा

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजपचा सर्वात विश्वासू मित्रपक्ष आहे शिवसेना

21 Jan 2025, 14:55 वाजता

सैफ अली खान जुन्या घरी जाणार

लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खान जुन्या घरी जाणार आहे

फॉर्च्युन हाईट या ठिकाणी जाणार

करीना रुग्णालयातून रवाना

21 Jan 2025, 13:29 वाजता

सैफला आज मिळणार डिस्चार्ज; करिना रुग्णालयात पोहोचली

अभिनेता सैफ अली खान याला आज लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. अभिनेत्री करिना कपूर खान लिलावती रुग्णालयात पोहोचली आहे. 16 जानेवारी रोजी सैफवर हल्ला झाल्यानंतर मागील पाच दिवसांपासून तो इथे उपचार घेत होता.