Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सैफ अली खान प्रकरणातील तपास अधिकारी बदलला

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रासहीत भारत आणि परदेशातील लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी

Swapnil Ghangale | Jan 21, 2025, 21:11 PM IST
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सैफ अली खान प्रकरणातील तपास अधिकारी बदलला

21 Jan 2025, 12:54 वाजता

समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाचा दणका; म्हणाले, नवाब मलिकांविरोधात...

नवाब मलिक यांच्या विरोधात ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल असताना पोलिस कारवाई करत नाही. शिवाय हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी मागणी समीर वानखेडे यांनी केली होती. यावर कोर्टाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होतेय. चौकशीअंती पोलिसांनी सी समरी दाखल केली आणि न्यायालयाने समीर वानखेडे यांची याचिका फेटाळली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून हायकोर्टात सी समरी रिपोर्ट सादर केला. ज्यामध्ये नवाब मलिक यांच्यावर एट्रासिटीचा गुन्हा दाखल होवू शकत नसल्याचे म्हटले गेले. ज्यामुळं समीर वानखेडे यांची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.

21 Jan 2025, 12:00 वाजता

नाशिक आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद शिवसेनेला मिळणार?

नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या मंत्र्यांना न मिळाल्यामुळे नाराज शिवसेना मंत्री दादा भूसे आणि भरत गोगावले आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे घोषित केलेले पालकमंत्री त्यांच्या नावाला सध्या स्थगिती दिली आहे. त्यामुळे नाराज शिवसेना मंत्र्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या या जिल्ह्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद महत्वाचे आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत दादा भूसे आणि भरत गोगावले यांच्या होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतेय हे आता पाहवं लागेल.

21 Jan 2025, 11:59 वाजता

14 नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील गरिआबंदमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 14 नक्षलवादी ठार

21 Jan 2025, 11:02 वाजता

ठाकरेंचा मोठा निर्णय? सर्व जिल्हाप्रमुखांना 24 जानेवारीला 'मातोश्री'वर हजर राहण्याचे आदेश

राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना बैठकीला शिवसेना भवन येथे उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व जिल्हाप्रमुखांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. 23 जानेवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अंधेरी येथे मेळावा होणार असून या मेळाव्याला मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्ते आणि राज्यातील जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे सर्व जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. 23 तारखेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असेल. आगामी महानगर पालिका निवडणुका स्वबळावर लढाव्या असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असल्याने या मेळाव्याला महत्व आहे. 

21 Jan 2025, 10:12 वाजता

'बांगड्या भरा, कशाला राजकारण करता?' शिंदेंच्या पक्षातील नेत्यांमध्येच जुंपली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला अब्दुल सत्तार विरुद्ध संजय शिरसाट वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. कारण संजय शिरसाट यांनी नाव न घेता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिकेचा बाण सोडला आहे. मी मंत्री झालो तर काही लोकांच्या पुन्हा पोटात दुखू लागले. वाढदिवसाच्या निमित्ताने मेळावे घेत आहेत. माझ्या विरोधात काम केले. संजना जाधव यांना पाडण्याचा प्रयत्न केला. पाडण्यासाठी पैसे लावले. बांगड्या भरा, कशाला राजकारण करता? लोकांचे घर जाळून शेकोटी करता. आमच्या नादाला लागला तर आमच्यात शिवसैनिक जिवंत आहे. आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही अशी थेट टिकाच संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केली

 

21 Jan 2025, 10:09 वाजता

नियम मोडणाऱ्या पर्यटकांना 3 ते 25 हजारांपर्यंत दंड

वन पर्यटनात नियम मोडल्यास पर्यटक, जिप्सी चालक आणि मार्गदर्शकांवर 3 ते 25 हजारांपर्यंत दंड ठोकण्याची तरतूद करण्यात आली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालकांनी शपथपत्राच्या माध्यमातून उच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. उमरेड क-हांडला अभयारण्यात वाघांची अडवणूक झाल्याच्या प्रकरणानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेतली होती. त्यानंतर आता वनविभागाने वन पर्यटनासाठी मानद कार्यप्रणाली तयार केली आहे. नवीन मानद कार्यप्रणालीनुसार पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड -क-हांडला अभयारण्यात लागू करण्यात आलीय.. त्यानंतर राज्यात लागू होईल

 

21 Jan 2025, 08:46 वाजता

ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचे पुण्यात निधन

ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचे निधन झालं आहे. संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार म्हणून साखरे महाराजांची ओळख होती. किसन महाराज साखरे यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चिंचवड येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान किसन महाराज साखरे यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज दुपारी आळंदी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांची तब्बेत बिघडली होती. त्यानंतर त्यांना चिंचवड येथील खाजगी रुग्णालयात भरती केले होते सोमवारी रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. साखरे यांनी मराठी संस्कृत भाषेत तब्बल 125 ग्रंथ लिहिले आहेत.

 

21 Jan 2025, 08:23 वाजता

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वे मार्गावर ट्रॅकला तडा; ट्रेन्सची वाहतूक उशीराने

पालघर - पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकला तडा गेला आहे. मुंबईकडे येणाऱ्या अप लाईनवरील रेल्वे ट्रॅकला तडा गेला. मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. वेळीच घटना लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. रेल्वे ट्रॅक बदलण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेत तातडीने कारवाई करण्यात आली. अप लाईन वरील गाड्यांचं वेळापत्रक काही काळासाठी खोळंबलं होतं. गुजरातकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर जिल्ह्यातील इतर रेल्वे स्थानकांवर थांबल्या आल्या होत्या. हळू हळू ट्रेन्स सुरु झाल्या आहेत.

21 Jan 2025, 08:00 वाजता

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 24 जानेवारी 2025 रोजी मुंबईला येत आहेत. ते गोरेगाव, मुंबई येथील नेस्को येथे "सहकारी बँका आणि पतसंस्थांसाठी आव्हाने आणि भविष्याचा मार्ग" या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. केंद्रीय सहकार मंत्रालय, महाराष्ट्र सहकार विभाग आणि एनयूसीएफडीसी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान शहा नाशिकमधील त्र्यंबक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरालाही भेट देऊ शकतात.

21 Jan 2025, 07:56 वाजता

कोंढवा परिसरात पुणे पोलिसांकडून आरोपींची धिंड 

कॉलेज परिसरात आणि कॉलेजमध्ये दहशत पसरवण्यासाठी दादागिरी करणाऱ्या आरोपींना पुणे पोलिसांनी अद्दल  शिकवली आहे. दहशत माजवण्यासाठी कॉलेज परिसरात गुंडागरी करणाऱ्या 7 आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 4 धारदार शस्त्र देखील पोलिसांनी जप्त केली आहे. भावेश बाळासाहेब कुंजीर, अथर्व कैलास पवार, सुरज सचिन राऊत,  आर्यन विलास पवार,  सौरम प्रदिप लोके,  राज दिगंबर रोंगे,  वरूण बबन भोसले अशी अटक करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे आहेत.