नागपूर : वायनाडमध्ये अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज नागपूरमध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आलीय. राहुल गांधी आज नागपूरच्या कस्तुरचंद पार्क इथं संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा घेत आहे. नागपूर काँग्रेसचे अमेदवार नाना पटोले आणि रामटेकचे उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारासाठी या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिघेला पोहचला असून, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोंदियातील सभेत त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केलीय. त्यामुळे आज राहुल गांधी काय प्रत्योत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
त्याआधी, काँग्रेस अध्यक्ष आज सकाळी ११.३० वाजल्याच्या दरम्यान तामिळनाडूच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पक्षातील वरिष्ठ नेते रमेश चेन्नितला यांनी ही माहिती दिलीय. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राहुल गांधीसोबत काँग्रेसचे दिग्गज नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. बहिण आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यादेखील यावेळी उपस्थित राहतील. त्यानंतर काँग्रसतर्फे शक्तिप्रदर्शन करण्यात येईल. यानिमित्त वायनाडच्या काँग्रेस भवन परिसरात जय्यत तयारी करण्यात आलीय.
आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या अमेठी सोबतच तामिळनाडूच्या वायनाड मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे.